साखरपुड्याच्या दिवशी घरात चोरी, नवरीची अंगठीही झाली गायब! 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याच्या लग्नावेळी घडलेलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:21 IST2025-12-01T16:56:19+5:302025-12-01T17:21:11+5:30
'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली.

साखरपुड्याच्या दिवशी घरात चोरी, नवरीची अंगठीही झाली गायब! 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याच्या लग्नावेळी घडलेलं असं काही...
Yogesh Shirsat: 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता योगेश शिरसाट.'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे योगेश शिरसाट. योगेशने आजवर या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.परंतु, तु्म्हाला माहितीये का आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या नायकांची लव्हस्टोरी तितकीच भन्नाट आहे.
नुकतीच योगेश आणि त्याची पत्नीने मराठी मनोरंजनविश्वला मुलाखत दिली. यावेळी दोघांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्यादरम्यान, योगशने म्हटलं,खरंतर माझा साखरपुडा आधी ३ जूनला ठरला होता. त्यावेळी माझ्या घरात एक अडचण आली त्यामुळे साखरपुडा ८ जूनला पुढे ढकळला. मग तो प्रॉब्लेम संपलाच म्हणून साखरपुडा २४ जुनला करायचं ठरवलं. २४ जूनपर्यंतही परिस्थिती आटोक्यात आली नाही म्हणून मी आईला सांगितलं की त्या लोकांना सांगून टाक की साखरपुडा नाही करायचा. तर आई म्हणाली, असं नाही साखपुडा करावाच लागेल.
त्यानंतर पुढे अभिनेत्याने सांगितलं," दुसऱ्या दिवशी साखरपुड्याला जाणार, सकाळी पाचला घरून निघायचं होतं आणि १० पर्यंत भुसावळला पोहोचायचं होतं. त्यावेळी सकाळी साडे चार- पाच वाजता उठल्यानंतर कळलं की, घरात चोरी झाली आहे. घरातील सोनं-नाणं, वडिलांच्या आणि माझ्या खिशातील सगळे पैसे गायब झाले. शिवाय हिच्यासाठी घेतलेली साखरपुड्याची अंगठीही गायब झालेली. पोलीस स्टेशनला कंम्पलेंट करायला गेलो काही होईना. मग नवीन अंगठी घ्यायची म्हणून १० वाजेपर्यंत सोनाराचं दुकान उघडेपर्यंत वाट बघतोय. हे लोक तिकडे आमची वाट पाहत बसले होते आणि आम्ही ११ वाजता घरातून निघालो."
सगळ्यांच्या मनात हेच होतं की...
"यामुळे हिच्या आईचा बिपी वाढला. तीन वेळा साखरपुडा पुढे ढकळला, यांना लग्न करायचं की नाही.लोक चर्चा करु लागले. पण, कसाबसा साखरपुडा झाला. सगळ्यांच्या मनात हेच होतं की हिचा पायगुण चांगला नाही. पणस लग्न करुन ही घरात आल्यानंतर सगळं काही सुरळीत झालं. त्यानंतर मग मला मुलगा झाला आणि त्याच्या पायगुणानंतर माझं आयुष्यचं बदललं." असा किस्सा अभिनेत्याने शेअर केला.
योगेश शिरसाटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने कॉमेडीची बुलेट ट्रेन, 'चला हवा येऊ द्या' अशा कार्यक्रमामध्ये त्याने काम केलं आहे. दुनियादारी या सिनेमात त्याने केलेल्या कामाचं चांगलंच कौतुक झालं.