अबोली समोर येणार आणखी एक नवं आव्हान; मालिकेत झालीये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:44 PM2024-04-03T16:44:44+5:302024-04-03T16:45:28+5:30

Tv serial aboli: अबोली ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.

marathi-actor-anant-jog-to-enter-in-star-pravah-serial-aboli | अबोली समोर येणार आणखी एक नवं आव्हान; मालिकेत झालीये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

अबोली समोर येणार आणखी एक नवं आव्हान; मालिकेत झालीये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे अबोली. पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे. अबोलीच्या वडिलांनी म्हणजेच प्रतापरावांनी मनवा हिच्यावर अतिप्रसंग केला आहे. ज्यामुळे मनवाला न्याय मिळावा यासाठी अबोली तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामध्येच आता या मालिकेत एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

मनवाला न्याय मिळावा यासाठी अबोली कोर्टात तिच्या वडिलांविरोधात केस लढणार आहे. तर तिच्या विरोधात सुप्रसिद्ध वकील देवदत्त खांडेकर ही केस लढणार आहेत. प्रतापरावांच्या बाजूने ते केस लढणार आहेत. त्यामुळे अबोलीपुढे एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेत देवदत्त खांडेकर या वकिलांच्या रुपात एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे.

नुकताच स्टार प्रवाहने या मालिकेचा एक प्रोमो रिलीज केली आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता अनंत जोग यांची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेत अनंत जोग हे वकील देवदत्त खांडेकर यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, अनंत जोग यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. खासकरुन खलनायकाची भूमिका म्हटलं की अनंत जोग यांचं नाव आपोआपच डोळ्यासमोर येतं. त्यामुळे अबोली मालिकेतही ते कशा प्रकारची करारी भूमिका साकारतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi-actor-anant-jog-to-enter-in-star-pravah-serial-aboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.