कोकणातील मराठी अभिनेत्याने कमालच केली; गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केला स्वत:चा मसाल्याचा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:13 IST2026-03-20T10:11:07+5:302026-03-20T10:13:15+5:30

एका मराठी अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

marathi actor abhijeet kelkar started his own new masala brand business | कोकणातील मराठी अभिनेत्याने कमालच केली; गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केला स्वत:चा मसाल्याचा ब्रँड

कोकणातील मराठी अभिनेत्याने कमालच केली; गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केला स्वत:चा मसाल्याचा ब्रँड

मराठी हिंदू नववर्षातला पहिला सण गुढीपाडवा गुरुवारी मोठ्या थाटामाटात सर्वत्र साजरा केला गेला. सेलिब्रिटींनीही घरोघरी गुढी उभारत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. अनेक सेलिब्रिटींनी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर आणि गाडी घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. 

लोकप्रिय मराठी अभिनेताअभिजीत केळकरने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. कोकणातल्या अभिजीतने मसाल्याचा ब्रँड सुरू केला आहे. 'अस्सल केळकर मसाले' असं त्याच्या ब्रँडचं नाव आहे. "गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझा स्वतःचा मसल्याचा ब्रँड घेऊन आलोय... तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रतिसाद हवाय... गणपती बाप्पा... मोरया", अशी पोस्ट शेअर करत अभिजीतने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. अभिजीतच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 


अभिजीत केळकर हा मराठीतील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'वहिनीसाहेब', 'तुझं माझं जमेना', 'असंभव', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'योगयोगेश्वर जय शंकर', 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्ये तो दिसला. 'मन पसंद की शादी' या हिंदी मालिकेतही अभिजीत झळकला आहे. 

Web Title : मराठी अभिनेता अभिजीत केळकरने गुढी पाडव्याला मसाला ब्रँड सुरू केला.

Web Summary : मराठी अभिनेता अभिजीत केळकरने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'अस्सल केळकर मसाले' या मसाल्याच्या ब्रँडची सुरूवात केली. अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा मागितल्या.

Web Title : Marathi actor Abhijit Kelkar launches spice brand on Gudi Padwa.

Web Summary : Marathi actor Abhijit Kelkar launched 'Assal Kelkar Masale', his spice brand, on Gudi Padwa. He has acted in many TV serials. He shared the news on social media, seeking blessings and support for his new venture.