फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:52 IST2017-10-04T11:17:02+5:302017-10-04T17:52:41+5:30

माझ्या नव-याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अनिता दातेने रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिकेची कथा आणि पात्रांमुळे अल्पावधीतच ही मालिका ...

The Maratha actress, who is appearing in the photo, which is meant for Lakshya | फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी

फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी

झ्या नव-याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अनिता दातेने रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिकेची कथा आणि पात्रांमुळे अल्पावधीतच ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरु लागलीय. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतील वैदर्भीय भाषेचा वापर. या मालिकेत अभिजीत खांडकेकर हा गुरुनाथ ही भूमिका साकारतोय. तर याच मालिकेत त्याची पत्नी राधिकाची भूमिका अनिता दाते साकारतेय. मालिकेत अनिता ही विदर्भातली दाखवण्यात आलीय. त्यामुळं तिचे संवादही वैदर्भीय लहेजातले आहेत. राधिकाचा व-हाडी अंदाज रसिकांना चांगलाच भावतोय.या मालिकेच्या माध्यमातून अनिता दातेने एक वेगळा फॅन फॉलोविंग निर्माण केला आहे. तिचे चाहते तिच्या भूमिकेला पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय. अनिताच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते लाईक्स आणि कमेंटस देत असतात. तसेच मालिकेच्या प्रत्येक एपिसोडविषयी आपले मत कळवत असतात.मात्र अनिता जास्त सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसते.जेव्हा तिला वेळ मिळतो तेव्हा ती सोशल मीडियावर येत आपल्या अपडेट शेअर करते.त्यात अनिताने तिचा एका वेगळाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो फोटो पाहून सा-यांनीच आश्चर्य व्यक्त केले.होय,या फोटोत अनिता अगदी फनी लूकमध्ये दिसतेय.त्यामुळे हा अनिता दातेचा फोटो असल्याचे कोणाला खरेच वाटले नाही. आता अनिता दातेला आपण या लूकमध्ये कधी पाहिलंय हे आठवत नसेल. तर 'अय्या' या रानी मुखर्जीचा मुख्य भूमिका असलेल्या हिंदी सिनेमात एका भूमिकेत अनिता दातेही झळकली होती.त्या भूमिकेतलाच अनिताचा हा फोटो आहे. ब-याचदा आपण कलाकरांना त्यांच्या विचित्र मेकअपमुळे ओळखत नाही. तसेच काहीसे अनिताच्या या फोटोविषयी म्हणावे लागेल. या फोटोत अनिताचा लूक पाहून सारेच थक्क होताना दिसतायेत.या मालिकेपूर्वी अनिताने भद्रकाली प्रॉडक्शनचं 'जस्ट हलकं फुलकं' या नाटकातही काम केले होते. सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे महाराष्ट्राचे विनोदवीर आणि अनिता दातेच्या उत्तम केमिस्ट्री आणि अभिनयामुळे हे नाटकही तुफान गाजले होते.

Also Read:टीम सेल्फी काढत ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेचे वर्षपूर्ती सेलिब्रेशन

Web Title: The Maratha actress, who is appearing in the photo, which is meant for Lakshya