इंडियन आयडलमध्ये आदित्य नारायणला रिप्लेस करणार टीव्हीवरील 'हा' लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:56 IST2019-12-21T12:46:05+5:302019-12-21T12:56:33+5:30

या शर्यतीत जय भानुशालीचे नाव देखील सामील होते. मात्र आता वेगळ्याच नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे.

Manish paul will host indian idol season 11 | इंडियन आयडलमध्ये आदित्य नारायणला रिप्लेस करणार टीव्हीवरील 'हा' लोकप्रिय चेहरा

इंडियन आयडलमध्ये आदित्य नारायणला रिप्लेस करणार टीव्हीवरील 'हा' लोकप्रिय चेहरा

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. 'इंडियन आयडल सीझन 11’  या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.  

'इंडियन आयडल सीझन 11' सूत्रसंचलान आदित्य नारायण करताना दिसतोय. मात्र अमर उजालाच्या रिपोर्टनुसार लवकरच या शोमध्ये मनीष पॉलची एंट्री होणार आहे. आदित्य नारायणची जागा मनीष पॉल घेणार आहे. मनीषने या आधी  'इंडियन आयडल सीझन 10’चे देखील सूत्रसंचलान केले होते.  


मनीष आधी या रेसमध्ये जय भानुशालीचे नाव देखील चर्चेत होते. मात्र आता मनीषच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे.   स्टार वन वाहिनीवरील ‘घोस्ट बना दोस्त’ या मालिकेत मनीषने भूताची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘जिंदादिल‘, ‘श२२२२ फिर कोई है’,‘कहानी शुरू विथ लव गुरू’ या मालिकांमध्ये अभिनय केला. लवकरच त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली.

अक्षय कुमार आणि कतरीना कैफ स्टारर ‘तीस मार खान’ तो झळकला. 2013 मध्ये ‘मिकी वायरस’ या सिनेमात तो लीड हीरो म्हणून तो दिसला.

Web Title: Manish paul will host indian idol season 11