खिडकीला उलटी लटकली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हटके वर्कआऊट पाहून नेटकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:26 AM2024-02-20T10:26:08+5:302024-02-20T10:26:42+5:30

कलाकार अभिनय आणि कामाबरोबरच त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसतात. अनेक कलाकारांचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

mandira bedi surprises fans with turn the frown upside down workout video goes viral | खिडकीला उलटी लटकली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हटके वर्कआऊट पाहून नेटकरी अवाक्

खिडकीला उलटी लटकली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हटके वर्कआऊट पाहून नेटकरी अवाक्

कलाकार अभिनय आणि कामाबरोबरच त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसतात. अनेक कलाकारांचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर काही कलाकार योगाचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना फिटनेसचं महत्त्व पटवून देत असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदिरा बेदी. टीव्ही मालिकेचा लोकप्रिय चेहरा आणि बॉलिवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटवण्यापर्यंत मंदिरा बेदी थांबली नाही. तर तिने क्रिकेटविश्वातही समालोचन करत तिची जादू दाखवून दिली. 

मंदिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मंदिरा फिटनेस फ्रिकही आहे. कायमच फिट असणाऱ्या मंदिराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती घरातील खिडकीला पकडून उलटी लटकताना दिसत आहे. त्यानंतर ती पुन्हा खाली येत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मंदिराचं हे हटके वर्क आउट पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. मंदिराच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

'शांती', 'औरत', 'घर जमाई', 'क्योंकी सास भी कभी बहू थी' अशा अनेक मालिकांमध्ये मंदिराने काम केलं आहे. क्रिकेटविश्वात मैदानात उतरून समालोचन करणारी मंदिरा पहिली महिला आहे. मंदिराने १९९९ साली राज कौशलशी विवाह केला होता. पण, २०२१ साली कार्डियक अरेस्टने तिच्या पतीचा मृत्यू झाल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यांना वीर हा मुलगा आहे. तर त्यांनी एका मुलीला दत्तकही घेतलं आहे, 

Web Title: mandira bedi surprises fans with turn the frown upside down workout video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.