"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:30 IST2025-07-07T11:30:26+5:302025-07-07T11:30:49+5:30
मानसी जवळपास १० वर्षांनंतर मालिकेत दिसत आहे. इतका मोठा ब्रेक का घेतला? यावर मानसीने नुकतंच उत्तर दिलं आहे.

"मी प्रेग्नंट होते, नंतर वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली...", मानसी कुलकर्णीचा खुलासा
मानसी कुलकर्णी (Manasi Kulkarni) ही मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून धाटणीच्या भूमिका साकारुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेमध्ये ती गायत्री प्रभू नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. मानसी जवळपास १० वर्षांनंतर मालिकेत दिसत आहे. इतका मोठा ब्रेक का घेतला? यावर मानसीने नुकतंच उत्तर दिलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मानसी म्हणाली, "मी मुद्दामून ब्रेक घेतला नव्हता. माझं छडा नावाचं नाटक सुरु होतं. नंतर प्रेग्नंसीमुळे ब्रेक घेतला. डिलीव्हरीनंतर बाळासाठी वेळ देणं गरजेचं होतं. त्यामुळे दीड दोन वर्ष त्यात गेली. त्यानंतर हळूहळू मी काम सुरु करेन असं ठरवलं. पण मला टीव्हीवर काम करायचं नव्हतं. कारण मालिकांसाठी खूप वेळ द्यावा लागतो. मूल लहान असताना ते शक्य नव्हतं. मी जाहिरात, सिनेमांमध्ये काम करत होते. त्यानंतर अनपेक्षितरित्या वैयक्तिक आयुष्यात खूप उलथापालथ झाली. त्यातून बाहेर येण्यात थोडा वेळ गेला. मग कोव्हिड आला. त्यात दोन वर्ष गेली. असं करत करत तो ब्रेक १० वर्ष झाला."
ती पुढे म्हणाली, "मग मी स्वत:ला तयार केलं की आता काम सुरु करुया. पण त्यातही माझं ठरलेलं होतं की मिळेल ते काम घ्यायचं नाही. प्राधान्य ठरवायचं. मला बाहेर गावी जाऊन राहायचं शूट नको होतं. मग मला थोडं तुझं थोडं माझं मालिका ऑफर झाली. मी शूट कुठे आहे हे आधी विचारलं. ते म्हणाले मुंबईतच असणार आहे. तसंच माझ्यासाठी भूमिका कशी आहे हेही महत्वाचं होतं. इतक्या वर्षांनंतर आता मी आलेल्या कामाला नाही म्हटलं तर परत काम मिळेल की नाही ही भीती मला नव्हती. माझ्यासाठी भूमिका कशी आहे हेच महत्वाचं होतं. ही मालिका माझ्यासाठी सगळ्याच दृष्टीने चांगली होती आणि मी टीव्हीवर कमबॅक केलं."
मानसी कुलकर्णी २०२० साली 'विजेता' सिनेमात दिसली होती. त्यानंतर २०२२ साली ती 'भाऊबळी' मध्ये झळकली. काही वर्षांपूर्वी 'शेजारी शेजारी पक्के शेजारी','१७६० सासूबाई' या मालिकांमध्ये दिसली होती.