Man Udu Udu Zhala : "सेटवर ही मला बहिण मिळाली..",कार्तिकने ऑनस्क्रिन बहिण मुक्तासाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:21 IST2022-08-11T12:57:02+5:302022-08-11T13:21:29+5:30
'मन उडू उडू झालं' मालिकेतील कार्तिकने त्याची ऑनस्क्रिन बहिणी मुक्तासाठी एक खास पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Man Udu Udu Zhala : "सेटवर ही मला बहिण मिळाली..",कार्तिकने ऑनस्क्रिन बहिण मुक्तासाठी लिहिली खास पोस्ट
बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा दिवस साजरा करण्यात बिझी आहे. यात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. 'मन उडू उडू झालं' मधील कार्तिक उर्फ ऋतुराज फडकेने त्याची ऑनस्क्रिन बहिणी मुक्तासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मन उडू उडू झालं मालिकेत मुक्ता उर्फ प्राजक्ता परबने कार्तिक आणि इंद्राच्या बहिणी भूमिका साकारली आहे. प्राजक्तासोबतचा फोटो शेअर करताना ऋतुराजने एका खास पोस्ट शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋतुराजची प्राजक्तासाठी पोस्ट
माझ्या खऱ्या आयुष्यात सख्खी बहिण नाही, पण या मालिकेत आमची मुक्ता @prajakta_parab_official हिला मी माझी सख्खी बहिण मानल आहे, सेट वर माझी काळजी घेणे, मध्यंतरी मी खूप आजारी होतो ,आणि तरी शूटिंग करणं गरजेचं होत, तेव्हा माझी विशेष काळजी ह्या मुलींनी घेतली, घरून माझ्या साठी डबा आणणे, मेकअप रूम मध्ये माझ्या जवळ बसून राहणे, माझ्या कडे त्या दिवसात विशेष लक्ष ठेवून होती.,गोळ्या घेतल्यास का? आता थोडावेळ आराम कर, अरे जास्त अंग गरम झाल आहे, ताप वाढतोय तू आता शूटींग नको करू घरी जा, मी बोलते शेड्युलरशी.असं हक्काने सांगणारी, प्रचंड बडबड करणारी, ती इतकी जेव्हा ती आमच्या मेकअप रूम मधून जाते तेव्हा एक भयंकर शांतता पसरते.., आणि मग १०मिन नंतर ती शांतता आम्हाला खायला उठते आणि आम्ही पुन्हा मुक्ताला आमच्या मेकअप रूम मध्ये बोलवून घेतो.🤣 की बाई बडबड कर...🤣🤣 मन उडू उडू झालं या मालिकेच्या सेटवर ही मला बहिण मिळाली...नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या खुप सार्या शुभेच्छा
ऋतुराजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. मानलेली नाती खुप घट्ट असतात मित्रा...,तुला पण रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा राज,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ऋतुराज सर अशा कमेंट्स त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.