"माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की...", कुशल बद्रिकेनं 'मॅडनेस मचायेंगे'चा सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:05 IST2024-07-06T16:04:09+5:302024-07-06T16:05:01+5:30

Kushal Badrike : नुकतेच कुशलने ‘मॅडनेस मचाएंगे’च्या सेटवरील फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

"Man could have a rainbow for himself, that...", Kushal Badrike's experience of 'Madness Machayenge' | "माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की...", कुशल बद्रिकेनं 'मॅडनेस मचायेंगे'चा सांगितला अनुभव

"माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की...", कुशल बद्रिकेनं 'मॅडनेस मचायेंगे'चा सांगितला अनुभव

चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). त्याने विनोदाच्या अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. कुशलचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच कुशलने ‘मॅडनेस मचाएंगे’च्या सेटवरील फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

कुशल बद्रिकेने ‘मॅडनेस मचाएंगे’च्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिले की, हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी असं काही मला वाटत नाही! पण माझा अमोल पणशीकर नावाचा मित्र मला कायम म्हणतो,स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही! म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मला खरंच मजा आली, खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं. आज आणि उद्या ह्या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत नक्की बघा “मॅडनेस मचायेंगे” सोनी हिंदीवर.


त्याने पुढे म्हटले की, आणि एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही, माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं. (सुकून) 

वर्कफ्रंट 
कुशल बद्रिकेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात ओळख मिळाली. हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर तो हिंदी टेलिव्हिजनकडे वळला. सध्या तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे.
 

Web Title: "Man could have a rainbow for himself, that...", Kushal Badrike's experience of 'Madness Machayenge'