तू म्हणजे वेड आहेस अगदी...! सिंधूताईंच्या लेकीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:26 IST2022-03-16T14:25:15+5:302022-03-16T14:26:51+5:30
Omkar Bhojane : तुमचा आमचा लाडका ‘कोकणचा कोहिनूर‘ अर्थात ओंकार भोजने याचा काल वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी अनेकांनी ओंकारसाठी खास पोस्ट शेअर केल्या. अशाच एका खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...

तू म्हणजे वेड आहेस अगदी...! सिंधूताईंच्या लेकीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारसाठी खास पोस्ट
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला तुमचा आमचा लाडका ‘कोकणचा कोहिनूर‘ अर्थात ओंकार भोजने (Omkar Bhojane) याचा काल वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी ओमीवर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने त्याला शुभेच्छा दिल्यात. अनेकांनी ओंकारसाठी खास पोस्ट शेअर केल्या. यादरम्यान अशाच एका खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही पोस्ट कोणाची तर सिंधूताईंच्या कन्येची.
होय, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ (Mamata Sindhutai ) यांनी ओंकार भोजनेसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
‘स्क्रीनवरचा तू... प्रत्यक्षातील तू
तू म्हणजे वेड आहेस अगदी...
आहे असाच कायम अस
भरभरून जग
भेटशील तेव्हा बड्डे पुन्हा सेलिब्रेट करूया...
तोवर आनंदात राहा, खुश राहा....,’ अशी पोस्ट ममतांनी फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
चिपळूण येथे शिक्षण घेत असताना ओंकारने एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक एकांकिकाही केल्या. त्यानंतर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज 2’ या सिनेमात नकारात्मक भूमिका त्याच्या वाट्याला आली. कॉमेडीची एक्स्प्रेस आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन शोने ओंकारला खरी ओळख दिली. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून त्याच्या विनोदी स्किटची प्रेक्षक आतुरतेने नेहमीच वाट पाहत असतात. समीर खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्या सोबतचे त्याचे स्किट असो वा गौरव मोरे, वनिता खरात सोबत जुळून आलेली केमिस्ट्री, त्यातून उडणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते. ओंकार सोशल मीडियाचा वापर करत नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती मात्र काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे.