'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मामंजींची होणार मंचावर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:34 IST2025-04-28T12:33:37+5:302025-04-28T12:34:10+5:30
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मामंजींची होणार मंचावर एन्ट्री
सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या सीझनमध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सून सासू सून या प्रेक्षकांच्या सगळ्यात जास्त आवडत्या प्रहसनात अशीच एक एन्ट्री आता होऊ घातली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मामंजींची मंचावर एन्ट्री होणार आहे. सचिन गोस्वामी हे मामंजींच्या पात्रात दिसणार आहेत. २ सुना आणि त्यांची सासू असे हे प्रहसन आहे. त्यांच्यातील सासू सुनांतील होणारे नेहमीचे वाद यावर हे प्रहसन असते. त्यात नेहमी उसाच्या शेतातून फोन कॉलवर फक्त आवाजाद्वारे प्रहसनात हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
"ठिव फोन" या विशेष अशा डायलॉगने नेहमी या प्रहसनाचा एंड होताना आपण पाहिलाय. पण आता चक्क मामंजी उसाच्या शेतातून थेट मंचावर येणार आहेत. आजवर मामंजी कधी येणार यावर उत्सुकता चाहत्यांमध्ये आहेच पण ते नक्की कोण असणार आणि त्यांच्या येण्याने या प्रहसनात आणखीन काय गंमत होणार हे आपल्याला येत्या पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी यांची मामंजीच्या रूपात एंट्री करणार आहेत.