'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 12:48 IST2018-11-13T12:15:42+5:302018-11-13T12:48:10+5:30

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेला एक अनपेक्षित वळण आले आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत.

Malhar show his different face to laxmi in laxmi sadaiva mangalam | 'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप !

'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप !

ठळक मुद्देलक्ष्मी आणि अजिंक्य मध्ये वाढणाऱ्या मैत्रीमुळे मल्हारला बराच त्रास होत आहे

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेला एक अनपेक्षित वळण आले आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मध्यंतरी लक्ष्मीने अजिंक्य बरोबर अबोला धरला होता. अजिंक्यने त्याच्या मनातील भावना लक्ष्मीला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे लक्ष्मी अजिंक्यशी बोलणे बंद केले होते. परंतु आता मात्र अजिंक्यने लक्ष्मीची समजूत काढली असून त्यांच्या मधील मैत्री कायम आहे... आणि याचेच कुठेतरी दु:ख, किंवा राग मल्हारच्या मनामध्ये आहे... लक्ष्मीसमोर गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे कोडे आहे आणि ते म्हणजे मल्हारचा बदलेला स्वभाव... ज्याची काळजी आता लक्ष्मीला वाटते आहे कारण मल्हारच्या अश्या विचित्र वागण्या मागचे कारण तिला कळत नाहीये... असे काहीसे दिवाळीमध्ये पाडव्याची दिवशी घडले होते ... मल्हारने एक वेगळीच अट लक्ष्मीला घातली होती ... आणि ती म्हणजे संध्याकाळी ७ वाजता लक्ष्मीने मल्हारला पहिल्यांदा ओवाळावे.... आणि आर्वीसाठी लक्ष्मीला मल्हारची ती अट मान्य करावी लागली होती...पण मल्हारच्या अशा विचित्र वागण्याने लक्ष्मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. हा गुंता लक्ष्मी कसा सोडवेल ? लक्ष्मी समोर मल्हारचे कोणते वेगळे रूप येईल ? लक्ष्मी ही परिस्थती कशी हाताळेल ? हे बघणे रंजक असणार आहे...

लक्ष्मी आणि अजिंक्य मध्ये वाढणाऱ्या मैत्रीमुळे मल्हारला बराच त्रास होत आहे ... मल्हारच्या लक्ष्मीवरील वाढत्या प्रेमामुळे त्याला आता लक्ष्मी आणि अजिंक्य मधली मैत्री देखील तोडायची आहे ... दुसरीकडे अजिंक्यने लक्ष्मीची मैत्री आणि विश्वास पुन्हा मिळवला असून केवळ लक्ष्मीच्या आग्रहाखातर तो कुस्ती खेळण्यास तयार झाला आणि त्याने तो सामना जिंकला देखील... आता लवकरच मल्हार लक्ष्मीला त्याला वाटणाऱ्या भावना आणि प्रेम तिच्या जवळ व्यक्त करणार असून लक्ष्मीला तिचा हक्क देखील मिळून देणार आहे ... परंतु हे सगळ होत असताना मल्हारचा एक वेगळाच चेहरा लक्ष्मी समोर येणार आहे.. आणि मल्हारच स्वत:चा मोठा शत्रू बनून स्वत:समोर उभा रहाणार आहे ... या सगळ्यामधून लक्ष्मी मल्हारला कशी वाचवेल ? अजिंक्य आणि तिची मैत्री लक्ष्मी कशी टिकवून ठेवेल ?  मल्हार पुढे काय करेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत...

Web Title: Malhar show his different face to laxmi in laxmi sadaiva mangalam