'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनीलचा समर लूक व्हायरल, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 16:48 IST2021-04-15T16:44:48+5:302021-04-15T16:48:09+5:30
अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनीलचा समर लूक व्हायरल, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव
अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. रसिका सुनिलनं अगदी हटके अंदाजात फोटोशूट केलायं.
रसिकाचा या फोटोतील समर लूकने सगळ्यांच लक्षवेधून घेतले आहे..रसिका बऱ्याचदा वेस्टन लूक करणं सर्वात जास्त पसंत करत असल्याचं दिसून येतेय. प्रत्येक वेस्टन आऊटफिट उत्तम रित्या कसा कॅरी करायचा हे देखील रसिकाला चांगलच ठावूक आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात काम केले आहे.