'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेने शेअर केला जुना फोटो, सोशल मीडियावर झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 17:06 IST2021-03-05T17:05:55+5:302021-03-05T17:06:54+5:30

गौतमीने तिचा पाच वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

majha hoshil na fame gautami deshpande shares 5 years ago picture on social media | 'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेने शेअर केला जुना फोटो, सोशल मीडियावर झाला व्हायरल

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेने शेअर केला जुना फोटो, सोशल मीडियावर झाला व्हायरल

ठळक मुद्देगौतमीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ 30 मिनिटांत 12 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.



अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमधील फोटो शेअर करत प्रेक्षकांनी वाहवा मिळवत असते. आता तिने तिचा पाच वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतदेखील ती तितकीच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.



गौतमीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ 30 मिनिटांत 12 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमी देशपांडेने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.



गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.

Web Title: majha hoshil na fame gautami deshpande shares 5 years ago picture on social media