माझा होशील नाच्या सेटवर गौतमी देशपांडे थापतेय भाकऱ्या, पण अशी झाली फजिती पाहा हा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 15:20 IST2021-06-19T15:16:51+5:302021-06-19T15:20:11+5:30

हा व्हिडिओ पाहून तिच्या पाककौशल्याचे कौतुक करण्याऐवजी नेटिझन्स तिला सुनावत आहेत.

majha hoshil na fame gautami deshpande makes rotis on set | माझा होशील नाच्या सेटवर गौतमी देशपांडे थापतेय भाकऱ्या, पण अशी झाली फजिती पाहा हा व्हिडिओ

माझा होशील नाच्या सेटवर गौतमी देशपांडे थापतेय भाकऱ्या, पण अशी झाली फजिती पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देगौतमी खूपच चांगल्या पद्धतीने भाकऱ्या थापत असून ती त्या भाजताना दिसत आहे.

माझा होशील ना ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील कलाकार एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. या मालिकेच्या सेटवर नेहमीच ते धमाल मस्ती करत असतात आणि आता तर या मालिकेच्या सेटवर मालिकेतील सई म्हणजेच गौतमी देशपांडे भाकऱ्या बनवताना दिसत असून तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौतमी भाकऱी थापत असून ती त्या भाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या पाककौशल्याचे कौतुक करण्याऐवजी नेटिझन्स तिला सुनावत आहेत. कारण कोणीतरी तिला भाकरी थापून दिली असून थापलेल्या भाकरीवरच ती भाकरी थापण्याचा अभिनय करत आहे आणि भाकरी भाजताना तव्यावर टाकताना तिने ती उलटी टाकली आहे आणि एवढेच नव्हे तर तिला तव्याचा चटका बसल्याचा आपल्याला दिसत आहे. 

माझा होशील ना... या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

Web Title: majha hoshil na fame gautami deshpande makes rotis on set