घटस्फोटानंतर माही विज पुन्हा प्रेमात? सलमान खानच्या जिवलग मित्रासाठी शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:38 IST2026-01-11T14:38:02+5:302026-01-11T14:38:59+5:30
जय भानुशालीशी नातं संपल्यावर माही विजचं नाव सलमानच्या मित्राशी जोडलं जातंय; कोण आहे हा नदीम?

घटस्फोटानंतर माही विज पुन्हा प्रेमात? सलमान खानच्या जिवलग मित्रासाठी शेअर केली पोस्ट
Mahi Vij : प्रसिद्ध टीव्ही कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांनी अलिकडेच काडीमोड घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच आता माही विजच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ती पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. माहीचे नाव आता सलमान खानचा जवळचा मित्र नदीम कुरेशी याच्याशी जोडले जात आहे.
माही विजने नुकतीच नदीम कुरेशीच्या वाढदिवसानिमित्त एक भावुक पोस्ट शेअर केली. माहीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "योगायोगाने नाही, तर मनापासून मी ज्याला निवडलं आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जो मी काहीही न बोलता माझं ऐकतो, जो माझ्या सोबत उभा राहतो, कारण त्याला तसं करावंच लागतं म्हणून नाही, तर त्याची इच्छा आहे म्हणून. तू माझं कुटुंब आहेस, माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझं सर्वकाही तू आहेस".
पुढे ती म्हणाली, "तू फक्त माझा जिवलग मित्र नाहीस, तर तू माझा आधार आहेस, माझी ताकद आहेस, माझं घर आहेस. तुझ्यासोबत मी जशी आहे तशीच राहू शकते. हो, कधी-कधी आपण भांडतो. हो, कधी कधी दिवसन्दिवस बोलतही नाही. पण ते कितीही लांबलं तरी शेवट एकाच ठिकाणी येतो. कारण आतून आपल्याला दोघांनाही माहीत आहे की नदिम आणि माही एकच आहेत. आपल्या आत्म्यांचा एकमेकांशी असा काही संबंध आहे, जो शब्दांत कधीच पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही".
माही म्हणाली, "आयुष्य नेहमी सोपं नव्हतं, पण तू माझ्या सोबत असलास की सगळं हलकं वाटतं, अधिक मजबूत वाटतं, अधिक सुंदर वाटतं. मी कमजोर असते तेव्हा तू माझा हात धरतोस, मी स्वतःवर विश्वास ठेवायला विसरते, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, आणि माझ्यातल्या अशा जखमा भरून काढतोस, ज्या आहेत याची मलाही कल्पना नव्हती".
पोस्टच्या शेवटी तिनं लिहलं, "माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे नादिम... तू कोण आणि कसा आहेस यासाठी नाही, तर तुझ्या सहवासात मला जे समाधान मिळतं, त्यासाठी माझं तुझ्यावर प्रेम आहे. संकटकाळात तू ज्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास, त्यासाठी मी तुझी ऋणी आहे. तू केवळ माझा मित्र नाहीस, तर तू माझं हृदय, माझं घर आणि माझं संपूर्ण कुटुंब आहेस, आज आणि नेहमीसाठी", असं माहीनं म्हटलं आहे.
माहीच्या पोस्टनंतर आता हा नदीम नेमका कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नदीम कुरेशी हा टेलिव्हिजन उद्योगातील एक प्रबळ नाव आहे. नदीम हा अभिनेता सलमान खानचा सर्वात जुना आणि जिवलग मित्र आहे. सलमान खानने जेव्हा २०१८ मध्ये त्याचे टीव्ही प्रॉडक्शन हाऊस 'SK TV' सुरू केले, तेव्हा नदीम कुरेशीची नियुक्ती मॅनेजिंग पार्टनर आणि CEO म्हणून करण्यात आली होती. याच बॅनरखाली प्रसिद्ध 'द कपिल शर्मा शो'ची निर्मिती झाली होती. जय भानुशालीशी घटस्फोट घेतल्याला आठवडाही उलटला नसताना माहीने नदीमसाठी व्यक्त केलेले हे प्रेम पाहून नेटकरी विविध तर्क लावत आहेत.