“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:25 AM2023-08-09T11:25:25+5:302023-08-09T11:25:51+5:30

विशाखा सुभेदारने ब्लू टिकबद्दल प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला दिलं उत्तर, म्हणाली...

maharashtrachi hasyjatra fame vishakha subhedar reply to fan who asked her insta blue tick | “इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."

“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."

googlenewsNext

उत्तम अभिनय आणि अपार मेहनतीच्या जोरावर मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदारने कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. सुरुवातीच्या काळात मनोरंजनविश्वात नशीब आजमावत असताना विशाखाने ट्रेनमध्ये ड्रेसपीस, नेलपेंट विकण्याचं कामही केलं आहे. कठीण परिस्थितीतून वाट काढत उत्कृष्ट अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर तिने यशाचं शिखर गाठलं. विशाखाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती नवीन प्रोजेक्टबाबत माहिती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

विशाखाचं इन्स्टाग्राम अकाऊंट नुकतंच वेरिफाय झालं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही दिवसांपूर्वीच ब्लू टिक मिळालं. तिचे इन्स्टाग्रामवर एक लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपूर्वी विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती आशा भोसलेंच्या झुंजूर मुंजूर गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने अकाऊंटला मिळालेल्या ब्लू टिकबाबत कमेंट केली होती. “ब्लू टिक किती रुपयांना घेतली? घेताना काही कमी करुन मागितले काय?” अशी कमेंट करत चाहत्याने विशाखाच्या इन्स्टा अकाऊंटच्या ब्लू टिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

ब्लू टिकबाबत प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला विशाखा सुभेदारने उत्तर दिलं आहे. त्याच्या कमेंटवर रिप्लाय करत विशाखाने “नाही हो...नेमकी विकत देत होते त्याच्या आदल्या रात्री ब्लू टिक मिळाली. सुदैवी नाहीतर उगाचच पैसे खर्च करावे लागले असते...thank god आणि हे insta वाले काहीच कमी पण नाही ना करत.. पण काय झालंय महिना तोच असल्याने गैरसमज होऊ शकतो...हा आत्ता विकत घेतली नाही ह्याचा पुरावा उभा नाही करु शकत तुमच्या कोर्टात...त्यामुळे जे घडलं ते मी आणि insta आम्हालाच माहीत आणि हे सत्य मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे...बाकीं आपणास काय समजायचं ते समजा,”असं म्हटलं आहे.

सध्या विशाखा स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत आहे. याआधी विशाखाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून तिने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं होतं. आजही प्रेक्षकांना हास्यजत्रेत तिची उणीव जाणवते. 

Web Title: maharashtrachi hasyjatra fame vishakha subhedar reply to fan who asked her insta blue tick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.