Vanita Kharat : “लोकांना वाटतं मी सेलिब्रिटी आहे, पण माझे आई-वडील अजूनही…” वनिता खरात स्पष्टच बोलली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:24 AM2023-04-04T10:24:09+5:302023-04-04T10:24:37+5:30

Vanita Kharat : मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या वनिताचा आज मोठा चाहता वर्ग आहे. आज घराघरात ती कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. सध्या चर्चा आहे ती तिच्या मुलाखतीची.

maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat talk about her lifestyle | Vanita Kharat : “लोकांना वाटतं मी सेलिब्रिटी आहे, पण माझे आई-वडील अजूनही…” वनिता खरात स्पष्टच बोलली 

Vanita Kharat : “लोकांना वाटतं मी सेलिब्रिटी आहे, पण माझे आई-वडील अजूनही…” वनिता खरात स्पष्टच बोलली 

googlenewsNext

Maharashtrachi Hasyajatra fame Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरातला (Vanita Kharat) आज कोण ओळखत नाही. वनिताने विविध धाटणीच्या भूमिका करत प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून तर तिला विशेष लोकप्रियता मिळाली. वजनाबाबत न्युनगंड न बाळगता तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या वनिताचा आज मोठा चाहता वर्ग आहे. आज घराघरात ती कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. सध्या चर्चा आहे ती तिच्या मुलाखतीची. होय, अलीकडे वनिता एका पॉडकास्टला दिलेल्यामुलाखतीत भरभरून बोलली.
वनिता आज सेलिब्रिटी आहे. पण आजही तिचे आईवडील चाळीतच राहतात. वनिता याच चाळीत लहानाची मोठी झाली. अगदी लग्न होईपर्यंत ती सुद्धा याच चाळीत राहत होती. यावर वनिताने भाष्य केलं. 


 
ती म्हणाली...
मुळात छोट्या वा मोठ्या पडद्यावर दिसणारी सगळ्या माणसांबद्दल सामान्य प्रेक्षकांना कुतूहल असतं. त्यांचं सेलिब्रिटी स्टेटस, त्यांची अलिशान लाईफस्टाईल, स्टायलिश राहणं वागणं याबद्दलही कुतूहल दिसतं. बडे सेलिब्रिटी निश्चितपणे अलिशान जगतात. पण काहीजण याला अपवाद असतात. वनिता यातलीच. ती म्हणते, “मी मध्यवर्गीय मराठी कुटुंबातील मुलगी आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांबद्दल लोकांच्या मनात अनेक कल्पना असतात. ते किती भारी दिसतात, किती कमाल लाईफस्टाईल जगतात, असं लोकांना वाटतं. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं नसतं. माझ्या मते, पैसा, राहणीमान व इतर बाबतीत प्रत्येक व्यक्ती हळूहळू प्रगती करतो. टीव्हीवर दिसणाऱ्या माणसांकडे खूप पैसे असताे असाही लाेकांचा समज असतो. पण खात्री बाळगा, असं काही नसतं. लग्न होईपर्यंत मी चाळीतच राहत होते. लग्नानंतर मी दुसऱ्या ठिकाणी राहायला आलेय. पण माझं बालपण चाळीत गेलं. माझे आईबाबा अजूनही त्याच दहा बाय दहाच्या चाळीच्या खोलीतच राहतात. जेव्हा मी बाईकवरुन फिरते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं. मी सेलिब्रिटी आहे तर मी गाडीनेच फिरलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. पण मला जसं आहे तसंच राहायला आवडतं. आपण साधी माणसं आहोत आणि मला तसंच राहायचं आहे...” 

गेल्या २ फेब्रुवारी रोजी वनिताने तिचा बॉयफ्रेन्ड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून वनिताच्या वैवाहिक जीवनाची चर्चा होताना दिसते.

Web Title: maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat talk about her lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.