जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक
By कोमल खांबे | Updated: October 16, 2025 19:29 IST2025-10-16T19:29:08+5:302025-10-16T19:29:30+5:30
अभिनयाव्यतिरिक्त पृथ्विक प्रताप सामाजिक भान जपत एनजीओंना मदत करत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये पृथ्विकने याबद्दल भाष्य केलं.

जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा हा अतिशय लाडका आणि लोकप्रिय कॉमेडी शो. याच शोमध्ये टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाल्यामुळे पृथ्विक प्रतापला प्रसिद्धी मिळाली. पृथ्विकचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अभिनयाव्यतिरिक्त पृथ्विक प्रताप सामाजिक भान जपत एनजीओंना मदत करत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये पृथ्विकने याबद्दल भाष्य केलं.
"मी या पॉडकास्टमधून सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला वाटतंय की मला शिक्षण घेता येत नाहीये. मला प्रॉब्लेम आहे...प्लीज मला कॉन्टॅक्ट करा काहीच प्रॉब्लेम नाही", असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे. शिक्षणासाठी काम करायचं ठरवलं, याबद्दल पृथ्विक म्हणाला की "माझे बाबा गेल्यानंतर माझ्या मामाने मला, आईला आणि भावाला मुंबईत आणलं. माझ्या वडिलांना मामाने वचन दिलं होतं की तुमच्या मुलांचं शिक्षण, संगोपन मी करेन. शिक्षणाचं महत्त्व मला कॉलेज संपल्यानंतर कळलं. जी व्यक्ती दहावी पास नाही(माझा मामा) त्याच्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो".
"कॉलेज संपल्यानंतर माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी बघतिलं. त्याने वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलं. तेव्हा जाणवलं की कोणाचं तरी शिक्षण पूर्ण करणं, कोणाला तरी शिक्षणासाठी मदत करणं हे किती गरजेचं आहे. कदाचित उद्या त्या व्यक्तीच्या मनात असा विचार येईल की या माणसामुळे माझं शिक्षण झालंय उद्या मी पण आणखी दोघांना मदत करतो. शिक्षणामुळे तुम्हाला समाजात आणि जगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळतो", असंही पृथ्विकने सांगितलं.