गौरव मोरेचा 'हास्यजत्रे'ला रामराम?; हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये केली दमदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:24 PM2024-04-12T13:24:33+5:302024-04-12T13:25:34+5:30

Gaurav more: 'मॅडनेस मचाएंगे'चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव कुशल बद्रिकेसह स्कीट सादर करतांना दिसत आहे.

maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-entry-in-madness-machayenge-hindi-comedy-show | गौरव मोरेचा 'हास्यजत्रे'ला रामराम?; हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये केली दमदार एन्ट्री

गौरव मोरेचा 'हास्यजत्रे'ला रामराम?; हिंदी कॉमेडी शो 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये केली दमदार एन्ट्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो छोट्या पडद्यावर कमालीचा लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील वनिता खरात, समीर चौघुले, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर या सगळ्याच कलाकार मंडळींनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.  त्यातही अभिनेता, विनोदवीर गौरव मोरे याच्या प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. मात्र, कायम हास्यजत्रेमुळे चर्चेत येणारा गौरव सध्या एका हिंदी कॉमेडी शोमुळे चर्चेत येत आहे. गौरवची एका हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली आहे.

‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत घराघरात लोकप्रिय झालेल्या गौरवने नुकतीच सोनी टीव्हीच्या मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमात एन्ट्री केली आहे. सोनी टीव्हीने या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरव मोरेदेखील झळकला आहे. 

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये गौरव, अभिनेत्री हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत स्कीट सादर करतांना दिसून येत आहे. त्यामुळे गौरवने आता त्याच्या स्वप्नांच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, गौरवला या हिंदी कॉमेडी शोमध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर हा कार्यक्रम जरी करत असला तरी सुद्धा हास्यजत्रा सोडू नकोस, असा सल्लाही नेटकऱ्यांनी त्याला दिला आहे.गौरव रिअॅलिटी शोसोबतच ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तो ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. 

Web Title: maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-entry-in-madness-machayenge-hindi-comedy-show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.