'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:20 IST2022-11-22T14:19:57+5:302022-11-22T14:20:15+5:30
गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे.

'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश
महाराष्ट्राची हास्यजत्रामधुन प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कलाकार आज स्टारपेक्षा काही कमी नाहीत. विनोदाची अचुक टायमिंग साधत हे कलाकार अफलातुन कॉमेडी करत असतात. म्हणुन अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरपुर पसंती मिळाली आहे. त्यात गौरव मोरे चे चाहते कोण नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राला गौरवने वेड लावले आहे.
गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे. गौरव नुकताच एका हिंदीजाहिरातीत झळकला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केला आहे.
ही जाहिरात एका पेंट कंपनीची आहे. यातही त्याची विनोदी स्टाईल दिसून येते. यामध्ये तो हेच पेंट का वापरावे हे सांगतोय मात्र त्याच्या कॉमेडी अंदाजात. गॉगल लावून एंट्री घेतलेल्या गौरव ला बघुन चाहतेही कौतुक करत आहेत.
गौरवने मराठी चित्रपटातही काम केले आहे. गौरवची लोकप्रियता बघता तो पुढे हिंदी सिनेमातही दिसला तरी आश्चर्य वाटायला नको.