बर्फाळ प्रदेशात एन्जॉय करतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, मजेशीर व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:14 IST2025-10-30T18:13:33+5:302025-10-30T18:14:13+5:30
कामातून ब्रेक घेत रसिका बर्फाळ प्रदेशात फिरायला गेली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

बर्फाळ प्रदेशात एन्जॉय करतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, मजेशीर व्हिडीओ केला शेअर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय आणि लाडका शो आहे. या शोने कित्येक नवोदित कलाकारांना टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. तर काही कलाकारांना हास्यजत्रेने लोकप्रियता मिळवून दिली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या रसिकाला हास्यजत्रेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. रसिका हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचली.
रसिकाचं फॅन फॉलोविंगही महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे वाढलं. रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना ती सोशल मीडियावर अपडेट द्यायची. कामातून ब्रेक घेत रसिका बर्फाळ प्रदेशात फिरायला गेली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओत रसिका बर्फात एन्जॉय करताना दिसत आहे. "उन्हाने पोळल्या जखमा , त्यावर गारव्याचे लिंपण करा !!", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, रसिकाने 'फ्रेशर्स', 'देवयानी', 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 'बाकरवडी' या हिंदी मालिकेतही ती दिसली होती. 'कीर्र काटा कीर्र', 'मुंज्या' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. आता रसिका वडापाव या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.