व्हॅकेशन मोड ऑन! 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून ब्रेक घेत समीर चौगुले कुटुंबासोबत पोहोचले लेह-लडाखला, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:33 IST2023-06-15T14:22:54+5:302023-06-15T14:33:45+5:30
फोटोमध्ये समीर चौगुले कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतायेत.

व्हॅकेशन मोड ऑन! 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून ब्रेक घेत समीर चौगुले कुटुंबासोबत पोहोचले लेह-लडाखला, फोटो व्हायरल
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपऊल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कामातून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत फिरत असतात.
सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौगुले सध्या आपल्या कुटुंबासोबत लेह-लडाखमध्ये फिरायला गेलेत आहेत. तिथले काही फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झालेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये समीर चौघुले आपल्या पत्नी आणि मुलांसोबत एन्जॉय करताना दिसतायेत.
समीर चौगुलेंच्या चाहत्यांसह सेलिब्रेटींनी ही या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून समीर कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतायेत. मराठी कलाविश्वात अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान समीर चौगुले यांनी निर्माण केलं आहे. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. सोशल मीडियावर समीरचा मोठा चाहता वर्ग आहे.