ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:03 PM2024-04-03T14:03:13+5:302024-04-03T14:03:40+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यानंतर ओंकार 'फू बाई फू' या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. पण, या शोने अगदी काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता नव्या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

maharahstrachi hasyajatra fame onkar bhojane to seen in colors marathi comedy show | ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

अभिनय आणि विनोदाची उत्तम जाण असणारा अतिशय गुणी नट म्हणजे ओंकार भोजने. विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांना पुरेपूर हसवतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून ओंकारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अगं अगं आई असो किंवा मामा...त्याचं प्रत्येक स्किट तुफान गाजलं. पण, मध्येच त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडला होता. त्यामुळे चाहते नाराज होते. पण, आता पुन्हा ओंकार प्रेक्षकांना हसवायला येणार आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यानंतर ओंकार झी मराठी वाहिनीवरील 'फू बाई फू' या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. पण, या शोने अगदी काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तेव्हापासून ओंकार छोट्या पडद्यापासून दूर होता. आता नव्या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हसताय ना...हसायलाच पाहिजे' या शोमधून आता ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे. यामध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदमही दिसणार आहेत. 

दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकारने अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'बॉइज २', 'बॉइज ३', 'सरला एक कोटी', 'शॉर्ट अँड स्वीट', 'एकदा येऊन तर बघा' या सिनेमांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
 

Web Title: maharahstrachi hasyajatra fame onkar bhojane to seen in colors marathi comedy show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.