मधुरा नाईकला लाभले ग्लॅमरचे वलय आणि नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:15 IST2018-02-05T09:45:23+5:302018-02-05T15:15:23+5:30

वास्तव जीवनातील बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी प्रसिध्द असलेली मधुरा नाईक ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत ...

Madhura Naika gained glamor and new look | मधुरा नाईकला लाभले ग्लॅमरचे वलय आणि नवा लूक

मधुरा नाईकला लाभले ग्लॅमरचे वलय आणि नवा लूक

स्तव जीवनातील बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी प्रसिध्द असलेली मधुरा नाईक ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत पलोमीची भूमिका साकारीत आहे. आमधुरा नाईक नेहमीच पल्या भूमिकेला साजेशी वेशभूषा करीत असली, तरी आता या मालिकेचा काही भाग बँकॉक येथे चित्रीत होत सताना तिने आपल्या भूमिकेला एक नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने आपली काही मादक छायाचित्रे प्रसृत करून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता तिने आपले भारतीय व्यक्तिमत्त्व पुसून टाकीत बँकॉकमध्ये आधुनिक,पाश्चिमात्य लूकचा स्वीकार केला आहे. हा लूक तिने स्वत:च निश्चित केला असून आपल्या निर्मात्यांच्या टीमलाही काही सूचना करण्याची विनंती केली आहे. मधुराला स्वत:ला मालिकेतील आपल्या भारतीय नारीच्या वेशभूषेपेक्षा पाश्चिमात्य वेशभूषा अधिक आवडते, ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे.आता परदेशातील कथाभागामुळे तिला आधुनिक वेश परिधान करण्याची संधी मिळताच तिने आपली भारतीय वस्त्रे उतरवून टाकली आणि आधुनिक, ग्लॅमरस पोशाख परिधान केला आहे. “आम्ही परदेशात चित्रीकरण करणार असल्याचं मला कळताच मला फार आनंद झाला. त्यामुळेच मी त्या कथाभागासाठी पाश्चिमात्य पोशाख करून माझ्या भूमिकेला ग्लॅमर प्राप्त करून दिलं आहे. प्रेक्षकांनाही माझा नवा लूक आवडेल,” अशी आशा आहे, असे मधुरा म्हणाली.नव्या, ग्लॅमरस रूपातील मधुराला पाहण्यास आम्ही उतावीळ झालो आहोत. 

माधुरी गेल्या 11 वर्षं इंडस्ट्रीत असून नेहमीच तिची वेशभूषा मॉडर्न राहिली आहे. त्यामुळे या मालिकेच्या वेशभूषेसाठी ती खूप उत्सुक आहे.  दिया और बाती हम या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा भाग तू सुरज मैं साझ पियाजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेत प्रेक्षकांना सध्या आणि सुरजच्या मुलांचा प्रवेश पाहायला मिळत आहे. त्यांची मुले वेद, वंश आणि कनक यांची कथा तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत दाखवली जात आहे. दिया और बाती या मालिकेत अनस रशिदने सुरजची तर दीपिका सिंगने संध्या सिंगची भूमिका साकारली होती. 

Web Title: Madhura Naika gained glamor and new look