मधुरा नाईकची होणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 11:31 IST2017-04-27T06:01:27+5:302017-04-27T11:31:27+5:30

मधुरा नाईकने कहानी घर घर की, अंबर धारा, दिल मिल गये, उतरण यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आतापर्यंतच्या सगळ्या ...

Madhura Naik will be in Suraj i Saj Piazi series entry | मधुरा नाईकची होणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत एंट्री

मधुरा नाईकची होणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत एंट्री

ुरा नाईकने कहानी घर घर की, अंबर धारा, दिल मिल गये, उतरण यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आतापर्यंतच्या सगळ्या मालिकांमध्ये प्रेक्षकांना मधुरा वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहायला मिळाली आहे. तसेच तिने नेहमीच मॉडर्न मुलीची भूमिका साकारली आहे. पण आता मधुरा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत लवकरच तिची एंट्री होणार आहे. पलोमी अशी भूमिका ती साकारणार असून या मालिकेबाबत ती प्रचंड उत्सुक आहे. याविषयी मधुरा सांगते, मी नेहमीच मालिकांमध्ये वेस्टर्न कपडे घातलेले आहेत. तसेच शहारातील मॉडर्न मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पहिल्यांदाच मी कोणत्याही मालिकेत भारतीय वेशभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा एक वेगळी भूमिका मी साकारत असल्याने माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे. या मालिकेतील माझी एंट्री ही किचनमध्ये होणार आहे. मी स्टोवर पुरी तळत आहे असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला स्वतःला जेवण बनवायला येत नसल्याने या दृश्याचे चित्रीकरण करायला मजा आली. तुम्ही जशा आहात, त्याच्यापेक्षा पूर्णपणे विरुद्ध व्यक्तिरेखा साकारणे हे खरेच खूप आव्हानात्मक असल्याची मला आता कल्पना येत आहे. 
माधुरी गेल्या 11 वर्षं इंडस्ट्रीत असून नेहमीच तिची वेशभूषा मॉडर्न राहिली आहे. त्यामुळे या मालिकेच्या वेशभूषेसाठी ती खूप उत्सुक आहे. 
दिया और बाती हम या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा भाग तू सुरज मैं साझ पियाजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेत प्रेक्षकांना संध्या आणि सुरजच्या मुलांचा प्रवेश पाहायला मिळत आहे. त्यांची मुले वेद, वंश आणि कनक यांची कथा तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेत दाखवली जात आहे. दिया और बाती या मालिकेत अनस रशिदने सुरजची तर दीपिका सिंगने संध्या सिंगची भूमिका साकारली होती. 

Web Title: Madhura Naik will be in Suraj i Saj Piazi series entry