बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:44 IST2019-07-10T12:25:55+5:302019-07-10T12:44:10+5:30

गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणुकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय.

Madhav deochakke becoming popular by audiance of big boss house | बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड

बिग बॉस मराठी २ : प्रेक्षकांची मन जिंकत बिग बॉसमधील हा सदस्य करतोय यशस्वी घोडदौड

गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणुकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. क्रिकेटर माधव देवचके स्पोर्टसमन स्पिरीटने बिग बॉसच्या घरात खेळताना दिसतोय. 

माधव देवचकेच्या अकाउंटवर सध्या बिग बॉस पाहणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे. ह्यातल्या बहुतेक प्रेक्षकांनी माधवला ‘स्टार परफॉर्मर’ म्हटलं आहे. माधव वेळोवेळी घरच्यांना कसा सांभाळून वागतो. तसेच एकही अपशब्द न बोलता कसा खेळतो, याविषयी प्रेक्षकांनी त्याची पाठ थोपटली आहे. बिग बॉस शक्तीने नाही तर युक्तीने आणि शांतपणे खेळला जाऊ शकतो, हे माधवने वेळोवेळी दाखवले आहे. 

माधवची आई कांचन देवचके म्हणतात, “बिगबॉस हा गेम तुमच्यातला संयम जोखण्याची स्पर्धा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरच्यांवरून एकमेकांना शिव्या घालणारे स्पर्धकही प्रेक्षकांनी पाहिले. पण कोणत्याही स्पर्धकाला आई-बहिणीवरून शिवी न घालता, कोणाचेही मन न दुखवता माधव खेळतोय. ह्याबद्दल माधवच्या चाहत्यांना नक्कीच त्याचा अभिमान वाटत असणार, म्हणूनच तर त्याचं सोशल मीडियावरून एवढं भरभरून कौतुक होतंय.”

पुढे त्या म्हणाल्या “आपल्या करियरच्या धावपळीत माधवला कधी घरकाम करायची संधी मिळाली नाही. आज जसा तो बिग बॉसच्या घरात सलग सात आठवडे राहिलाय. तसा घरी कधीच राहिला नाही आहे. आम्हाला त्याच्या अभिनय कारकिर्दीचा आणि बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाचा नेहमीच अभिमान राहिल.”

Web Title: Madhav deochakke becoming popular by audiance of big boss house