​लुब्ना सलिम सांगतेय मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:00 IST2018-06-07T08:30:37+5:302018-06-07T14:00:37+5:30

बा बहू और बेबी या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक ...

Lubna Salim Kuntetey Maryam Khan - About her role in Reporting Live | ​लुब्ना सलिम सांगतेय मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी

​लुब्ना सलिम सांगतेय मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी

बहू और बेबी या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तसेच ओह माय गॉड या चित्रपटात ती परेश रावलच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. लुब्नाने केवळ छोट्या पड्यादवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही खूपच चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. आज लुब्ना हे छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. ती नुकतीच चक्रव्यूह या मालिकेत दिसली होती आणि आता मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतील लुब्नाची भूमिका खूपच चांगली असल्याने या मालिकेत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे. या मालिकेत ती रिफत अश्रफची भूमिका साकरणार आहे. या मालिकेतील तिची भूमिका ही तिच्या खऱ्या आयुष्यातील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या मालिकेमधील आपल्या रिफत या भूमिकेबद्दल लुबना सांगते, “रिफत ही लुबनापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रिफत ही आंबटगोड आणि तिखट मिरची असून आत्मकेंद्री आहे आणि या मालिकेत तिची खलनायकी भूमिका आहे. तिचे तिच्या परिवारावर प्रेम आहे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी ती काहीही करू शकते. तिच्या आणि माझ्या बाबतीत ही एकच गोष्ट समान असून बाकी सगळं वेगळं आहे. अर्थातच आपल्यापेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.”
या मालिकेत काम करण्यास ती आनंदित असण्यामागे एक खास कारण आहे. सलिम आरिफ हे या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहे. सलिम हे लुब्नाचे पती असून त्यांच्यासोबत पहिल्यांदाच ती एकत्र काम करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने या दोघांना सेटवर एकत्र वेळ घालवता येणार असल्याने लुब्ना खूप खूश आहे. याविषयी ती सांगते, “माझ्या पतींसोबत काम करायला मिळणार असल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे. ते खाजगी आयुष्यात कसे आहेत हे मला माहीत आहे. ते सेटवर देखील मस्तीखोर आहेत का हे पाहणे खूपच मजेशीर असणार आहे. मी या मालिकेत काम करण्यास खूपच उत्सुक आहे.”

Also Read : या कारणामुळे मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे लुब्ना सलिम

Web Title: Lubna Salim Kuntetey Maryam Khan - About her role in Reporting Live