Bigg Boss Marathi 2 : Love is in the Air! वीणानं अनोख्या पद्धतीनं शिवकडे व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:43 IST2019-08-07T19:43:07+5:302019-08-07T19:43:39+5:30

‘बिग बॉस’चा प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे.

Love is in the Air: Veena has expressed her love to Shiva in a unique way, watch her video | Bigg Boss Marathi 2 : Love is in the Air! वीणानं अनोख्या पद्धतीनं शिवकडे व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 2 : Love is in the Air! वीणानं अनोख्या पद्धतीनं शिवकडे व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून नुकतीच रुपाली भोसले बाहेर पडली आहे. ७५व्या दिवसाकडे वाटचाल होत असताना घरामध्ये विविध घडामोडी पहायला मिळत आहेत. त्यात राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वीणा जगताप व शिव ठाकरे त्यांच्या मैत्रीमुळे चर्चेत असतात. त्यात दिवसेंदिवस त्यांच्यातील प्रेम वाढत चाललं असल्याचं पहायला मिळत आहे. त्यात सोशल मीडियावर दाखल झालेल्या प्रोमोमध्ये वीणा चक्क तिच्या पापण्यांवर शिवचं नाव कोरताना दिसते आहे.


‘बिग बॉस’चा प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. वीणाने आयब्रो पेन्सिलच्या मदतीने शिवचं नाव लिहिलं असून त्याच्या नावाच्या बाजूला हार्ट काढल्याचंही दिसत आहे. तिने हे सरप्राईज शिवला दिलं असून तोदेखील हे पाहून खूप खूश झाला आहे. मात्र तिने हे का केलं याचा उलगडा आगामी एपिसोडमध्ये होईल.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या कॅप्टनसी टास्क मध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. तर हीनाने केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली.

या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद आणि भांडणं झाली शिव आणि आरोहमध्ये झालेल्या झटापटीमुळे बिग बॉस यांनी कार्यासाठी दिलेल्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले आणि त्यामुळेच हीना या टास्कची संचालिका असल्याने तिने दोघांदेखील बाद केले, “हीनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कॅप्टनसीच्या निर्णय प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला इम्युनिटी मिळते त्याच कार्यात केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉसने  हीनाला शिक्षा दिली.

रुपालीने घराबाहेर पडल्यावर तिला एक विशेष अधिकार मिळाला त्यानुसार तिला कोणत्याही एका सदस्याला या आठवड्या मध्ये सेफ करण्याची संधी मिळाली आणि तिने हीनाला सेफ केले होते

पण काल बिग बॉस यांनी ती इम्युनिटी तिच्याकडून काढून घेतली

Web Title: Love is in the Air: Veena has expressed her love to Shiva in a unique way, watch her video