Love In The Air..! शिवनं वीणाकडे अनोख्या अंदाजात व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 13:19 IST2019-11-26T13:18:28+5:302019-11-26T13:19:40+5:30

बिग बॉस मराठी हा शो संपल्यानंतरही शिव व वीणा सतत एकत्र फिरताना पहायला मिळतात.

Love In The Air ..! Shiv Thakare expressed love to Veena, watch this video | Love In The Air..! शिवनं वीणाकडे अनोख्या अंदाजात व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

Love In The Air..! शिवनं वीणाकडे अनोख्या अंदाजात व्यक्त केलं प्रेम, पहा हा व्हिडिओ

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपून जवळजवळ महिना झाला आहे. मात्र या सीझनची चर्चा अद्याप होताना पाहायला मिळते आहे. याचं कारण आहे यंदाच्या सीझनचा विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं अफेयर. बिग बॉस मराठी २ च्या घरात शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. त्यांच्या नात्यावर त्यावेळी बरीच टीकादेखील झाली होती. शो संपल्यानंतर रोमान्सही संपेल, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. पण असं काहीच झालं नाही. उलट ‘बिग बॉस मराठी २’ संपल्यानंतर शिव आणि वीणाचा रोमान्स आणखी जोरात सुरू झाला आहे.


बिग बॉस मराठी २ शो संपल्यानंतर आता वीणा आणि शिव यांची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. वीणाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिव प्यार तुझ करता हूँ देख मेरे आँखों में या गाण्यातून वीणाकडे प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. १ कोटीहून जास्त व्हुज या व्हिडिओला मिळाले आहेत. 


शिव आणि वीणा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला लग्नाविषयी विचारले असता त्याने सांगितले होते की, आता घराबाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे.

माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.

आता ते दोघे लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Web Title: Love In The Air ..! Shiv Thakare expressed love to Veena, watch this video