‘द व्हॉइस’च्या अंतिम फेरीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले असणार सेलिब्रिटी अतिथी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 19:00 IST2019-05-04T19:00:00+5:302019-05-04T19:00:00+5:30

हा विशेष भाग स्पर्धक तसेच नामवंत प्रशिक्षकांकडून सादर केल्या जाणार्‍्या कार्यक्रमांमुळे या कार्यक्रमाची अंतिम फेरी ही प्रेक्षकांसाठी एक भव्य मनोरंजन संगीत जलसा ठरेल.

The legendary singer, Asha Bhosle, to be a celebrity guest for The Voice finale | ‘द व्हॉइस’च्या अंतिम फेरीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले असणार सेलिब्रिटी अतिथी!

‘द व्हॉइस’च्या अंतिम फेरीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले असणार सेलिब्रिटी अतिथी!

छोट्या पडदायावरील ‘द व्हॉइस’ हा आता आपल्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ही अंतिम फेरी जिंकून कोणता स्पर्धक सोन्याचा चषक पटकावतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमातील अदनान सामी, हर्षदीप कौर, कनिका कपूर  आणि अरमान मलिक या प्रशिक्षकांना या अंतिम फेरीत भारतातील महान गायिका आशा भोसले या सेलिब्रिटी अतिथी म्हणून लाभतील.

या कार्यक्रमाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, “या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहणार  आहेत. या कार्यक्रमात त्या सर्व स्पर्धकांना आपले अनुभव सांगतील; तसंच आपल्या गाण्यात सुधारणा करण्यासाठी त्या त्यांना मौलिक सल्लेही देतील. या अंतिम चार स्पर्धकांतून सुयोग्य विजेता निवडण्यातही त्या प्रशिक्षकांना मदत करतील.”

स्टार प्लसवरील द व्हॉइसच्या अंतिम फेरीतील महान गायिका आशा भोसले यांच्या उपस्थितीमुळे आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास सर्वच स्पर्धकांना मोठी प्रेरणा मिळणार आहे. हे स्पर्धक तसेच नामवंत प्रशिक्षकांकडून सादर केल्या जाणार्‍्या कार्यक्रमांमुळे या कार्यक्रमाची अंतिम फेरी ही प्रेक्षकांसाठी एक भव्य मनोरंजन संगीत जलसा ठरेल.
 

Web Title: The legendary singer, Asha Bhosle, to be a celebrity guest for The Voice finale