हळद लागली! 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याची लगीनघाई, हळदीचा व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:48 IST2025-11-16T10:47:07+5:302025-11-16T10:48:11+5:30
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मेघन अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

हळद लागली! 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याची लगीनघाई, हळदीचा व्हिडीओ समोर
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मेघन अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकतंच अनुष्काच्या मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. तर मेघनच्या घरीही लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेघनच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकरची लगीन घटिका समीप आली आहे. मेघनच्या घरी त्याच्या हळदीचा कार्यक्रम झाला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने आणि पूजा विधी करत मेघनच्या हळदीचा कार्यक्रम करण्यात आला. मेघनच्या हळदी समारंभातील गोड क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कुटुंबीय मेघनला हळद लावताना दिसत आहे. यामध्ये मेघनचा भाऊ अभिनेता मंदार जाधव, त्याची पत्नी आणि दोन मुलंही अभिनेत्याला हळद लावत आहेत.
मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मेघन सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारत आहे. तर अनुष्का पिंपुटकर 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करत आहे. याआधी ती 'रंग माझा वेगळा' मालिकेत पाहायला मिळाली.