लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:39 IST2026-01-07T15:38:28+5:302026-01-07T15:39:29+5:30
आता गोला आणि काजूला बहिणही येणार का? भारतीचं पापाराझींना भन्नाट उत्तर

लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..!
कॉमेडियन आणि टीव्ही शो होस्ट भारती सिंहने नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. तिने १९ डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला. लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच भारती कामावर परतली आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने अजून दुसऱ्या मुलाचं नावही रिव्हील केलेलं नाही. त्याला प्रेमाने काजू असं नाव दिलं आहे. त्याआधीच भारती 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर आली आहे. तिने आजपासून कामाला सुरुवातही केली आहे. शिवाय यावेळी तिने पापाराझींना मिठाईचंही वाटप केलं.
भारती सिंह 'लाफ्टर शेफ्स'च्या सेटवर असतानाच तिला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारतीला दुसऱ्यांदा मुलगा झाला.गुडन्यूज ऐकून चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आता बाळाच्या जन्मानंतर २० दिवसातच भारती पुन्हा लाफ्टर शेफच्या सेटवर आली आहे. तिने पापाराझींशी गप्पा मारल्या. त्यांना मिठाई दिली. पापाराझींनी तिचं अभिनंदन केलं. तेव्हा भारती म्हणाली, 'काजू आ गया...सोचा तो था किशमिश आएगी पर काजू आ गया'. पापाराझींनी गंमतीत विचारलं, 'किशमिश भी आएगी' तेव्हा भारती चकित होऊन म्हणाली, 'यही करती रहूँ? शूटिंग भी होती है ना...'
भारती सिंह युट्यूब चॅनलवर नेहमी व्लॉग शेअर करत असते. दुसऱ्या प्रेग्नंसीवेळी तिला श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचं तिने व्लॉगमध्ये सांगितलं होतं. आता २० दिवसात भारतीला कामावर आलेलं पाहून चाहत्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. भारतीने आराम करायला हवा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
भारती आणि हर्ष लिंबाचियाने ३ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. ३ एप्रिल २०२२ रोजी भारतीने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव लक्ष असं ठेवलं. त्याला प्रेमाने गोला म्हणतात. तर आता घरी आणखी एक छोटा गोला आला आहे. त्यामुळे भारती सिंहच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.