घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची 'करवा चौथ'बद्दल पोस्ट, दिला महत्त्वाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:50 IST2025-10-12T13:49:47+5:302025-10-12T13:50:05+5:30
पतीपासून विभक्त झाल्यानंतर लता सभरवाल यांनी 'करवा चौथ'बद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची 'करवा चौथ'बद्दल पोस्ट, दिला महत्त्वाचा संदेश
छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. गेल्या काही वर्षांपासून ही मालिक व त्यातील कलाकार प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. या मालिकेतून अक्षरा हे पात्र साकारुन अभिनेत्री हिना खान घराघरात पोहेचली. अक्षराच्या आईची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री लता सभरवाल यांनाही याच मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे लता सभरवाल यांनी ऑनस्क्रीन पतीच्या भुमिकेत असलेल्या संजीव सेठ यांच्याशी लग्न केलं. पण, अलिकडेच २०२५ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली. आता पतीपासून विभक्त झाल्यानंतर लता सभरवाल यांनी 'करवा चौथ'बद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
नुकतंच करवा चौथ हा सण पार पडला. हा सण साजरा करू न शकलेल्या महिलांसाठी लता सभरवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक खूप भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहलं, "ज्यांना करवा चौथ साजरा करता आला नाही त्यांच्यासाठी... एकिकडे जेव्हा प्रत्येकजण त्यांचे करवा चौथचे फोटो शेअर करत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही काही कारणास्तव हा सण साजरा करू शकत नाहीत. तेव्हा सिंदूर, बांगड्या, मेहंदी आणि नवीन कपड्यांची कमतरता जाणवून मागे हटू नका. या भावनांना स्वीकारा आणि त्यांचा सामना करा. आपण आपल्या भावनांपासून जितके जास्त पळतो, तितकेच त्या आपल्याला त्रास देतात. आणि... दुःखी होणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल शोक करणे पूर्णपणे ठीक आहे. पण... कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. कारण असे बरेच सण आहेत, जे तुम्ही साजरे करू शकता. सकारात्मक राहा, आशावादी राहा आणि पुढे जात राहा".
लता आणि संजीव सेठ यांचे वैयक्तिक आयुष्य
लता सभरवाल आणि वर्षीय संजीव सेठ यांची पहिली भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या सेटवर झाली होती आणि २००९ मध्ये त्यांनी लग्न केले. २०१३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव आरव सेठ आहे. लता सभरवाल यांच्याशी लग्न करण्यापूर्वी संजीव सेठ यांनी अभिनेत्री रेशम टिपनीस यांच्याशी १९९३ मध्ये लग्न केले होते. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रेशम टिपनीसपासूनही त्यांना रिषीका आणि मानव ही दोन मुलं आहेत. तसंच लता सबरवाल यांना प्रपोज करण्यापूर्वी त्यांनी मुलांची परवानगी घेतल्याचाही त्यांनी खुलासा केला होता.