१४ महिने अन् ४२८ एपिसोड; 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:17 IST2025-10-06T11:11:07+5:302025-10-06T11:17:38+5:30
लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला-"हा प्रवास इथेच थांबतोय पण..."

१४ महिने अन् ४२८ एपिसोड; 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट
Marathi Serial: छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या मालिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान तयार करतात, त्यातील पात्रे प्रत्येकाला हवीहवीशी वाटतात. एकदा मालिका हिट झाली की त्यातील प्रत्येक कलाकाराला घराघरात पसंती मिळते. टीव्हीवरील अशाच एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.ही मालिका म्हणजे लाखात एक आमचा दादा.आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि तुळजावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सुर्या दादाची कहाणी मालिकेतून पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काळात टीआरपीमध्ये अव्वल असणारी ही लोकप्रिय मालिका १४ महिन्यांच्या प्रवासानंतर ही मालिका ऑफ एअर झाली आहे.त्यामुळे मालिकेत काजुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने भावुक पोस्ट लिहिली आहे.
'लाखात एक आमचा दादा मालिकेत' नितीश चव्हाण , मृण्मयी गोंधळेकर तसेच गिरीष ओक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ८ जुलै २०२४ ला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर १४ महिन्यांतच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. दरम्यान, मालिकेत काजू नावाची व्यक्तिरेखा अभिनेता महेश जाधवने साकारली होती. त्याच्या कामाची सगळ्यांनीच प्रशंसा केली. दरम्यान, मालिका संपताच अभिनेता भावुक झाला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याने लिहिलंय, ८ जुलै २०२४- ४ ऑक्टोबर २०२५ ।भागा मागून भाग संपते शिरीयलींचे बाई फट्ट पांढरे वरी पसरले टिपूस गाळत नाही । ‘ काजु ‘ या नावातच गोडवा आणि किमतीने महाग असंच या पात्राच होत. या काजु चा पण मालिके मध्ये एक गोडवा होता आणि तितकीच त्याची वेगळी किंमत होती.नितीश चव्हाण... रिश्ता वही सोच नई भावा तुझी दादागिरी खरच काम करताना भावली.या दादा च्या प्रवासात काही नवीन जीवाभावाची लोक भेटली. ईशा संजय, जुई ताणपुरे, कोमल मोरे,स्वप्नील कानसे तसंच अतुल कुडाले आणि शुभम पाटील खूप प्रेम दोस्तांनो मला एवढ प्रेम दिलंत."
त्यानंतर अभिनेत्याने गिरीष ओक यांना टॅग करत लिहिलंय," सर तुमच्या कौतुकाची थाप कायम लक्षात राहील ,तसेच माझ्या पेक्षा वयाने खूप मोठे असणारे माझे म्हणजेच नाना मामा तात्या छत्री तुम्हाला एक पप्पी. काजु या पात्रावर विश्वास ठेवनारी लोक म्हणजेच,मॅम लेखक स्वप्नील चव्हाण, नितीन वडेवाले २०१७ पासून माझ्यावर कायम विश्वास ठेवणारे निर्मात्या श्वेता शिंदे मॅम,खांबे सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.दिग्दर्शक किरण दळवी भावा तुझ्या मला फ्री हैंड ठेवण्याने काजू चा गोडवा वाढवता आला.शिवराज नांगरे पाटील तिसऱ्या डोळ्यांनी मार्क वर उभे राहून तो तुम्हाला दाखवता आला.@santoshbansode135 च्या साइलेंस ने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तसेच मालिकेचे पडद्यामागिल प्रोडक्शन ,लाइट,सेटिंग,स्पॉट मेकअप कपडेपट तूमच्या जीवापाड मेहनत आणि कष्टामुळे आम्ही इतके छान दिसलो तुम्हा सगळ्याचे मनापासून खूप खूप आभार."
हा प्रवास इथेच थांबतोय पण...
"गेली सलग ७ वर्षे माझ्यावर प्रेम करत आलेली @zeemarathiofficial चे मनापासून धन्यवाद .सरते शेवटी तुम्ही रसिक मायबाप प्रेषक तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुमच्या या प्रेमाला सुद्धा खूप आभार हा प्रवास इथेच थांबतोय पण लवकरच नवीन काम घेऊन तुमच्यासमोर येईन प्रेम आणि आशिर्वाद असुद्यात." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.