ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
By कोमल खांबे | Updated: December 23, 2025 12:54 IST2025-12-23T12:54:11+5:302025-12-23T12:54:46+5:30
मराठी मालिकांचा लाडका चेहरा असलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
यंदाचं हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास ठरलं आहे. अनेकांना या वर्षात जोडीदार मिळाला. तर काहींनी लग्न करत संसारही थाटला. आता आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. मराठी मालिकांचा लाडका चेहरा असलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
ज्ञानदाने तिच्या मेहेंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या हातावर नव्या नवरीसारखी सुंदर मेहेंदी दिसत आहे. या मेहेंदीच्या व्हिडीओत ज्ञानदाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. "हात मेहेंदीने भरलेले आणि हृदयात त्याने जागा केलीय", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ज्ञानदाने अंगठीचा इमोजीही पोस्ट केला आहे.
ज्ञानदाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लग्न ठरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. "ठरलं... कळवतो लवकरच!", असं कॅप्शन देत तिने लग्न ठरल्याचं सांगितलं आहे. ज्ञानदाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञानदा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
दरम्यान, ज्ञानदाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.