'लग्नाची बेडी' फेम सुमुखी पेंडसे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:11 IST2024-05-16T17:10:49+5:302024-05-16T17:11:20+5:30

Sumukhi Pendse : 'पुकार-दिल से दिल तक' मालिकेत अभिनेत्री सुमुखी पेंडसे राजेश्वरी महेश्वरी नामक खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.

'Lagnachi Bedi' fame Sumukhi Pendse to appear in Hindi serial 'Pukar-Dil Se Dil Tak' | 'लग्नाची बेडी' फेम सुमुखी पेंडसे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये

'लग्नाची बेडी' फेम सुमुखी पेंडसे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये

'लग्नाची बेडी' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुमुखी पेंडसे (Sumukhi Pendse) लवकरच एका हिंदी मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे  ‘पुकार – दिल से दिल तक’. सोनी एण्टरटेन्मेंटवर लवकरच दाखल होणाऱ्या या मालिकेत सायली साळुंखे, अभिषेक निगम, अनुष्का मर्चंडे हे कलाकार दिसणार आहेत. या मालिकेची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे. आई म्हणजे सरस्वती आणि तिच्या दोन मुली- वेदिका आणि कोयल यांची ही गोष्ट आहे, ज्यांना एका दुष्ट योजनेने एकमेकींपासून दूर करण्यात आले आहे. पण, नशीब सरस्वती, वेदिका आणि कोयल या तिघींना नकळत, अनपेक्षित परिस्थितीत पुन्हा एकत्र घेऊन येते. त्यांच्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या शक्तीविरुद्ध त्या तिघींना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे.

अभिनेत्री सुमुखी पेंडसे राजेश्वरी महेश्वरी ही खलनायिका साकारणार आहे. ती महेश्वरी कुटुंबाची प्रमुख आहे. तिची व्यक्तिरेखा भारदस्त आहे, आपल्या कुटुंबावर आणि व्यवसाय साम्राज्यावर तिची जबरदस्त पकड आहे. ती चलाख आहे, सर्वांवर वर्चस्व गाजवणारी आहे आणि आपल्या कुटुंबाचा वारसा जपण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिचा अविचल अभिमान आणि अहंकार यामुळे आपली बरोबरी कुणीच करू शकत नाही या तिच्या विचाराला खतपाणी मिळाले आहे.


 
सुमुखी पेंडसे म्हणते, पुकार – दिल से दिल तक मालिकेतील राजेश्वरीची भूमिका ही बरीचशी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील जया बच्चनच्या भूमिकेसारखी आहे. मी ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे, कारण एक तर ही अनेक पदर असलेली भूमिका आहे आणि दुसरे कारण म्हणजे या निमित्ताने मला एका कडक स्वभावाच्या उद्योजिकेची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. राजेश्वरीचा पाताळयंत्री स्वभाव तिच्या जवळच्या व्यक्तींच्या आकांक्षा आणि ध्येयाच्या आड येणार आहे. यातून एक रोचक संघर्ष, ट्विस्ट आणि सत्ता-संघर्ष उद्भवलेला दिसेल. प्रेम, नशीब आणि पुनर्भेटीच्या या मालिकेतील नकारात्मक भूमिका करणाऱ्या राजेश्वरीच्या स्वभावातल्या गुंतागुंतीत प्रेक्षकांना खिळवून ठवण्याची क्षमता आहे.

Web Title: 'Lagnachi Bedi' fame Sumukhi Pendse to appear in Hindi serial 'Pukar-Dil Se Dil Tak'