Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:02 PM2023-12-27T16:02:48+5:302023-12-27T16:14:36+5:30

'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. 

lagir zal ji fame purva shinde kata kirr lavani song released watch video | Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी

Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिर झालं जी'. झी वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. या मालिकेत जयडीची भूमिका साकारून अभिनेत्री पूर्वा शिंदे घराघरात पोहोचली. पूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा वैयक्तिक आयुष्याबाबतही पूर्वी पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. पूर्वाचे हॉट फोटो अनेकदा चर्चेत असतात. आता मात्र पूर्वाच्या ठसकेबाज लावणीची चर्चा रंगली आहे. 

पूर्वाचं 'काटा किर्र' हे लावणी साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील हे पाचवं गाणं आहे. अवधूत गुप्ते यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. तर मुग्धा कऱ्हाडेंनी या गाण्याला आवाज दिला आहे. पूर्वाचं हे लावणी साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. 

'लावण्यवती' या अल्बममधील 'गणराया', 'करा ऊस मोठा', 'लावा फोन चार्जिंगला' या गाण्यांप्रमाणेच काटा किर्र या गाण्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. 

'लावण्यवती' अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, "आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी  ‘लावण्यवती' या अल्बममधील 'काटा किर्र' हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येत आहे. हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी अपेक्षा आहे."

Web Title: lagir zal ji fame purva shinde kata kirr lavani song released watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.