'लाडो वीरपूर' की मर्दानी एक झेप घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:08 AM2018-03-27T09:08:36+5:302018-03-27T14:38:36+5:30

सामाजिक नाटय असलेला लाडो-वीरपूर की मर्दानी आता एक झेप घेण्याच्या मार्गावर आहे.आणि कथानकातील उलगडणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना अचंबित करून सोडणार ...

'Laddo Veerpur' will take a leap from Mardani | 'लाडो वीरपूर' की मर्दानी एक झेप घेणार

'लाडो वीरपूर' की मर्दानी एक झेप घेणार

googlenewsNext
माजिक नाटय असलेला लाडो-वीरपूर की मर्दानी आता एक झेप घेण्याच्या मार्गावर आहे.आणि कथानकातील उलगडणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना अचंबित करून सोडणार आहे. नुकतेच प्रेक्षकांनी पाहिले आहे की अविका गोर साकारत असलेल्या अनुष्काने शेवटी तिच्या बहिणीचा सूड उगवला रणतेज आणि त्याच्या गँगला शिक्षा देऊन.आगामी ट्रॅक मध्ये अनुष्का रणतेज वर सूड घेत असताना मल्हारीने त्याला वाचविण्यासाठी आकाश पाताळ एक केले. युवराज (शालीन मल्होत्रा) ला जेव्हा कळते की अनुष्काच्या जीवनात त्याच्या कुटुंब वाईट वागले आहे तेव्हा तो तिच्या बाजूने उभा राहतो पण मल्हारीच्या नव्या योजनेत तिला वाचविताना तो मरतो. एका कड्यावरून उडी मारणाऱ्या अनुष्काच्या जीवनात तो कलाटणी देणारा क्षण ठरतो. ती जागी होते तेव्हा ती एका वजनदार घरात असल्याचे तिला कळते आणि ते तिला जुही म्हणून बोलावत असतात.शो वरील प्रमुख भूमिका सादर करण्यासाठी नवीन निष्णात कलाकार घेण्यात आलेले आहोत आणि ते आहेत नासिर खान,मानिनी डे, फरिदा दादी, अशू शर्मा आणि तारू असोपा.अविका गोर (अनुष्का) याला दुजोरा देत म्हणाल्या, “लाडोचे निवेदन इतके काटेकोर आणि जलद गतीचे योजलेले आहे की त्यामुळे तुम्ही पुढे काय होईल याचा विचार करू लागता. शोवरील मनोरंजकता वाढविणाऱ्या या झेपेची मी प्रतिक्षा करत आहे.माझी व्यक्तिरेखा असलेल्या अनुष्काच्या जीवनावर अनेक मार्गांनी परिणाम करणारे आकर्षक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नामवंत कलाकार घेण्यात आलेले आहेत. मला विश्वास आहे की शोवरील हा नवीन ट्रॅक प्रेक्षकांना नक्की आवडेल.”सेठीच्या कुटुंबाच्या मालमत्तेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ वकीलाची भूमिका भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये दीर्घकाळ काम केलेले नासीर खान करत आहेत. टेलिव्हिजन वर दीर्घकाळानंतर येणाऱ्या मानिनी डे जुहीच्या सावत्र आईची भूमिका करत आहेत आणि त्या शो वरील नवीन व्हॅम्प आहेत.अभिनेता अशू शर्मा, जुहीचा (अविका गोर) मामा असणार आहे जो नकारात्मक भूमिका साकारत आहे आणि तो अतिशय लोभी आणि धूर्त माणूस आहे.त्याला सेठी कुटुंबाचे सर्व पैसे खिशात घालायचे आहेत.अभिनेत्री फरिदा दादी एका अतिशय गोड व प्रेमळ पंजाबी आजीची भूमिका करत आहेत, तर चारू असोपा मानसिक रीत्या दुर्बल मुलीची भूमिका करत आहेत,जिचे लग्न तर या श्रीमंत पंजाबी कुटुंबात झाले आहे पण तिचा नवरा तिच्या वर प्रेम करत नाही.असा ट्रॅक आगामी भागात या मालिकेत रसिकांना पाहायसा मिळणार आहे.

Web Title: 'Laddo Veerpur' will take a leap from Mardani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.