ऑन स्क्रीन दीर-भावजय गेल्या १५ वर्षांपासून राहातात लीव्ह इनमध्ये... अशी आहे त्यांची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 13:02 IST2018-11-01T13:00:58+5:302018-11-01T13:02:28+5:30

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' याच मालिकेच्या सेटवर संदीप आणि अश्लेषा या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. चित्रीकरणाच्या वेळी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असल्यानेच ते दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame sandeep baswana and ashlesha sawant love story | ऑन स्क्रीन दीर-भावजय गेल्या १५ वर्षांपासून राहातात लीव्ह इनमध्ये... अशी आहे त्यांची लव्ह स्टोरी

ऑन स्क्रीन दीर-भावजय गेल्या १५ वर्षांपासून राहातात लीव्ह इनमध्ये... अशी आहे त्यांची लव्ह स्टोरी

संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत या दोन्ही टीव्ही कलाकारांनी 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत. संदीपने या मालिकेत साहिल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेत तो गंगा म्हणजेच शिल्पा सकालानीच्या पतीच्या भूमिकेत होता तर अश्लेषाने साहिलचा भाऊ गौतमच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी कमल या मालिकेत देखील एकत्र काम केले होते. या मालिकेत देखील ते दोघे नायक-नायिकेच्या भूमिकेत नव्हते. संदीप आणि अश्लेषा गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात असून ते दोघे लीव्ह इन मध्ये राहत आहेत. 

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' याच मालिकेच्या सेटवर संदीप आणि अश्लेषा या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. चित्रीकरणाच्या वेळी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असल्यानेच ते दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या या प्रेमकथेविषयी संदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही सुरुवातीला एकमेकांचे केवळ खूपच चांगले मित्र होतो. पण एकदा अश्लेषा घरी आली आणि ती त्यानंतर परत कधीच गेली नाही. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही एकत्र राहात आहोत. 

दोघे गेल्या १४ वर्षांपासून लीव्ह इन मध्ये राहत आहेत. इतकी वर्षं लीव्ह इन मध्ये राहिल्यानंतरही त्यांचा लग्नाचा कोणताच विचार नाहीये. कुठल्याही बंधनाविना ते आजही एकमेकांसोबत खूश आहेत. एका मुलाखतीदरम्यान अश्लेषाने सांगितले की, एका लहान गावात माझे बालपण गेले आहे. मी एका छोट्याशी गावातील मुलगी असल्याने सर्वच जण मला संदीपपासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. पण माझा त्याच्या प्रेमावर विश्वास होता. यासाठी मला लग्नाची किंवा कोणत्याही पेपरची कधीच गरज पडली नाही. 

संदीपला त्याच्या लग्नाच्या प्लॅनविषयी विचारण्यात आले असता तो सांगतो, आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत राहायला आवडते. पण त्यासाठी लग्न करण्याची गरज मला वाटत नाही. समाज काय म्हणेन याचा आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही जोपर्यंत एकमेकांसोबत खूश आहोत तोपर्यंत सोबत राहू नाहीतर वेगळे होऊ हा सर्वस्वी आमच्या दोघांचा निर्णय असेल आणि भविष्यात आम्ही मुलाचा विचार केला तर त्याच्या आधी आम्ही नक्कीच लग्न करू...

Web Title: Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame sandeep baswana and ashlesha sawant love story