या टीव्ही अभिनेत्याने सुरू केले हॉटेल, घरखर्च चालवण्यासाठी घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 16:20 IST2020-02-29T16:17:38+5:302020-02-29T16:20:18+5:30

गोहरने 'स्टारडस्ट' या मासिकाच्या कव्हरवर झळकली आहे. या कव्हरवरील तिचा फोटो कुशलला खूपच आवडला होता.

Kushal Tandon launch Restaurant-SRJ | या टीव्ही अभिनेत्याने सुरू केले हॉटेल, घरखर्च चालवण्यासाठी घेतला हा निर्णय

या टीव्ही अभिनेत्याने सुरू केले हॉटेल, घरखर्च चालवण्यासाठी घेतला हा निर्णय

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये कलाकरांमध्येही रुढ झाला आहे. विविध मालिका आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता कुशल टंडनने अभिनयाव्यतिरिक्तही हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे . त्याच्या हॉटेलच्या ओपनिंगला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. कुशल अंकिता लोखंडेसह नात्यात होता. 


त्यानंतर त्यांच्यात बिनसले आणि त्याने आपला मोर्चा गौहर खानकडे वळवला.  गौहरसह असलेल्या अफेरमुळे जास्त चर्चेत आला होता. सध्या कुशल अभिनय क्षेत्रात फारसा सक्रीय नसून हॉटेल व्यवसायाता त्याचा जम बसवणार असल्याचे दिसते.

कुशल आणि गौहर यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते दोघे आजही एकमेकांचे भरपूर चांगले फ्रेंड्स आहेत. पार्टी, अथवा एखाद्या कार्यक्रमात समोरासमोर आल्यावर दोघे एकमेकांशी आवर्जून बोलतात. तसेच ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर ते एकमेकांना फॉलो करतात. त्यामुळे एकमेकांच्या वाढदिवसाला अथवा एखाद्या नवीन शोच्यावेळी ते दोघे एकमेकांना नेहमीच शुभेच्छा देतात.

गोहरने 'स्टारडस्ट' या मासिकाच्या कव्हरवर झळकली आहे. या कव्हरवरील तिचा फोटो कुशलला खूपच आवडला होता. या मासिकाचे कव्हरपेज इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर शेअर करून त्याने तिची स्तुती केली होती. त्याने म्हटले होते की, हैदर खानने गौहरचा काढलेला फोटो पाहिला. हा फोटो शेअर केल्याशिवाय मी राहूच शकलो नाही. गौहर ही दिसायला खूप छान असण्यासोबतच ती एक स्टायलिश अभिनेत्री आणि चांगल्या मनाची व्यक्तीदेखील होती.

 

Web Title: Kushal Tandon launch Restaurant-SRJ