'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण, कुशल बद्रिकेची स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:00 PM2024-03-02T12:00:40+5:302024-03-02T12:01:06+5:30

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Kushal Badrike's special post on 10 years of 'Chala Hawa Yeu Dya' programme | 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण, कुशल बद्रिकेची स्पेशल पोस्ट

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण, कुशल बद्रिकेची स्पेशल पोस्ट

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर त्याने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, आता त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. 

अभिनेता कुशल बद्रिके याने इंस्टाग्रामवर चला हवा येऊ द्याच्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिले की, चला हवा येऊ द्या ह्या आपल्या कार्यक्रमाला बघता बघता दहा वर्ष झाली, लवकरच त्यावर सविस्तर लिहीन पण तूर्तास त्या दिवशीचा माझा लूक शेअर करतोय. 

प्रतिक्रिया
अभिनेता कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, चला हवा येवू द्या म्हणजे कुशल दादा आणि कुशल दादा म्हणजे चला हवा येवू द्या असं गणित झालंय... दुसऱ्या युजरने लिहिले की, ना दिखावा करतो,"ना दुनियादारी करतो"...."भाऊ ज्या वेळी मैदानातउतरतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो. आणखी एकाने म्हटले की, आम्हीही डोक्याला केस नसताना बघत होतो. आज सगळे केस चालले तरीही बघतो. पण आपल्या टीम च उत्साह पाहता दुःख दुःख कधी राहत नाही, आणि कुशल बद्रिके तुमच्या कॅप्शनमधील कमेंट आणि तुमच्या कविता ,चारोळ्या यांनी भारावून जातो ,असेच आमचं टक्कल गुळगुळीत होयीपर्यंत हसवा, कारण हस्ताय ना हस्लाच पाहिजे..


शोबद्दल
'चला हवा येऊ द्या' या शोचा पहिला एपिसोड २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या शोच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व विनोदवीर घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमाने या सर्व कॉमेडियन खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन हे कॉमेडियनदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवत राहिले. थुकरटवाडी या गावात घडणाऱ्या गमतीजमती ते पोस्टमन या सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल.

वर्कफ्रंट...
कुशल सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचे चाहते त्याला हिंदी शोमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.
 

Web Title: Kushal Badrike's special post on 10 years of 'Chala Hawa Yeu Dya' programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.