कुशल बद्रिकेची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री इतकी सुंदर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:29 IST2020-01-06T19:28:50+5:302020-01-06T19:29:35+5:30

कुशलने त्याच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून त्याच्या या फोटोला त्याच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

kushal badrike wife picture | कुशल बद्रिकेची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री इतकी सुंदर, पाहा तिचे फोटो

कुशल बद्रिकेची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री इतकी सुंदर, पाहा तिचे फोटो

ठळक मुद्देकुशल त्याच्या चित्रपटाच्या, कार्यक्रमाच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवतो.

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचं मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्किट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. 

कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे कुशल रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.

कुशलने त्याच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून त्याच्या या फोटोला त्याच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळत आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियांचे फोटो पोस्ट करत असतो. त्याची पत्नी ही दिसायला अतिशय सुंदर असून मुलगा देखील खूपच गोड आहे. 

कुशल त्याच्या चित्रपटाच्या, कार्यक्रमाच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवतो.

कुशल नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. काही दिवसांपूर्वी कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये कुशल आणि भाऊ स्वतःच्या पत्नीविषयी तसंच जेवणाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांची जेवणाची आवड आणि पत्नी काय जेवण करते असा संवाद या दोघांमध्ये रंगल्याचा दिसला होता. या व्हिडीओसह कुशलने एक पोस्टही टाकली होती. “बायकोच्या मिठीत आयुष्य काढण्याची स्वप्नं बघता बघता आपण कधी तिच्या मुठीत जातो कळतं नाही. अनुभवाने सांगतो खूप हसवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात खूप दुःख दडलेले असतं.” 

Web Title: kushal badrike wife picture