The Kapil Sharma Show : कृष्णा अभिषेकने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:42 PM2022-08-23T14:42:08+5:302022-08-23T14:42:34+5:30

The Kapil Sharma Show : कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण

Krushna Abhishek Confirmed Why He Is Quitting The Kapil Sharma Show | The Kapil Sharma Show : कृष्णा अभिषेकने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, जाणून घ्या काय आहे कारण

The Kapil Sharma Show : कृष्णा अभिषेकने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, जाणून घ्या काय आहे कारण

googlenewsNext

द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show  ) पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या दमात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण हो, नव्या सीझनमधून ‘सपना’ मात्र गायब असणार आहे. होय, या शोमध्ये आता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek ) दिसणार नाहीये. खुद्द कृष्णाने या वृत्ताला दुजोरा दिला असून यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक नसणार म्हटल्यावर चाहते निराश आहेत. कधी जॅकी श्रॉफ बनून, कधी धर्मेन्द्र बनून तर कधी सपना बनून हसवणाऱ्या कृष्णाला चाहते नक्कीच मिस करणार आहेत.

कृष्णाने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला म्हटल्यावर अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. कपिल शर्मासोबतच्या मतभेदामुळे कृष्णाने शो सोडल्याची चर्चा होती. कमी मानधनामुळे कृष्णा अभिषेकने शो सोडल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.पण आता कृष्णाने या चर्चांना पूर्णविराम देत, शो सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

पिंकविला या न्यूज पोर्टलशी बातचीत करताना त्याने यामागचं कारण स्पष्ट केला. शोमध्ये मी नाही, हे खरं आहे. काही अ‍ॅग्रीमेंट इश्यूज होते, असं तो म्हणाला.  निर्मात्याशी कॉन्ट्रॅक्टसंबंधी काही समस्या असल्याने हा शो सोडावा लागतोय. जेवढं प्रेक्षक मला मिस करणार आहेत तेवढंच मी देखील त्यांना करणार आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी आज या ठिकाणी आहे, असंही तो म्हणाला.

शोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा व कृष्णा यांच्यात बिनसल्याची चर्चा खोटी आहे. दोघांत काहीही वाद नाहीत. मानधनाच्या मुद्द्यावरून निर्माते  आणि कृष्णामध्ये काही समस्या आहेत.  मानधनाच्या मुद्द्यावर कृष्णा अभिषेकला या शोमधून बाहेर पडावं लागलं आहे. याचा कपिल शर्माशी काहीच संबंध नाही.  

Web Title: Krushna Abhishek Confirmed Why He Is Quitting The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.