Koffee With Karan 6 : मी सुद्धा दोषी! अखेर करण जोहर बोलला...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 13:07 IST2019-01-23T13:05:54+5:302019-01-23T13:07:15+5:30
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे.

Koffee With Karan 6 : मी सुद्धा दोषी! अखेर करण जोहर बोलला...!!
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अलीकडे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली आणि या शोने नवा वाद ओढवून घेतला. हार्दिक आणि के. एल. राहुल या दोघांनी या एपिसोडमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केलीत आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवरही प्रचंड टीका झाली. सोशल मीडियाने हार्दिक व के. एल. राहुल यांना फैलावर घेतले. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, हार्दिक पांड्या व के. एल. राहुलवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली. त्यांना आॅस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावले. हे प्रकरण अंगलट आल्याचे पाहताच हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली. पण तरिही हा वाद थांबला नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे.
होय, एका ताज्या मुलाखतीत करण यावर बोलला. या संपूर्ण प्रकरणासाठी हार्दिक व के. एल. राहुल जितके जबाबदार आहेत, तितकाच मी सुद्धा आहे, असे करण म्हणाला. हा शो माझा आहे आणि मीच हार्दिक व राहुल यांना गेस्ट म्हणून बोलवले होते. मीच प्रश्न विचारले आणि म्हणून हार्दिक व राहुल बोलले. त्यामुळे त्यांच्या चुकीत मी सुद्धा भागीदार आहे. या वादानंतर मी अनेक रात्री झोपलो नाही. मी हे सगळे कसे ठीक करू? माझे कोण ऐकणार? असे प्रश्न मला सतावत राहिलेत. आता हे सगळे प्रकरण माझ्या नियंत्रणाबाहेर गेले आहे, असे करण म्हणाला.
— hardik pandya (@hardikpandya7) January 9, 2019
काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू श्रीसंतने या संपूर्ण प्रकरणात करणलाच दोषी ठरवले होते. हार्दिक व राहुल काही चुकीचे बोलत असताना पाहून करणने त्यांना थांबवायला हवे होते. शोचा होस्ट या नात्याने ही त्याची जबाबदारी होती, असे श्रीसंत म्हणाला होता.