नच बलियेमध्ये मोनालिसा आणि विक्रांतने नृत्य करताना घेतले चुंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 15:12 IST2017-04-07T09:42:02+5:302017-04-07T15:12:02+5:30

नच बलिये या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकेल आहे. या कार्यक्रमात सध्या ...

Kiss in dance with Monalisa and Vikrant in Nach Baliye | नच बलियेमध्ये मोनालिसा आणि विक्रांतने नृत्य करताना घेतले चुंबन

नच बलियेमध्ये मोनालिसा आणि विक्रांतने नृत्य करताना घेतले चुंबन

बलिये या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकेल आहे. या कार्यक्रमात सध्या 10 जोड्या दिसत असून या जोड्या आपले धमाकेदार नृत्य सादर करत प्रेक्षकांची आणि परीक्षकांची प्रशंसा मिळवत आहेत. या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा, टेरेन्स लुईल आणि मोहित सुरी परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. 
या कार्यक्रमात प्रेक्षकांना मोनालिसा आणि विक्रांत यांची जोडी पाहायला मिळत आहे. हे दोघेही भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार आहेत. या दोघांनी या कार्यक्रमात नुकतेच एक नृत्य करत असताना एकमेकांचे जाहीर चुंबन घेतल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नृत्य सादर करत असताना या नृत्याद्वारे त्यांनी एक प्रसंग सादर केला. त्यात मोनालिसा ही एक श्रीमंत मुलगी तर विक्रांत हा दूधवाला भैय्या बनला होता. या प्रसंगानुसार त्यांच्यात एक पैज लागते आणि ती पैज विक्रांत जिंकतो. यामुळे मोनालिसाला त्याच्या गालाचे चुंबन घ्यावे लागते. पण नृत्यप्रकार संपता संपता मोनालिसाने केवळ गालाचेच चुंबन घेतले नाही तर त्याच्या ओठांचेही चुंबन घेतले. पण यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. हा एक कौटुंबिक कार्यक्रम असल्याने जोडप्यांनी आपले प्रेम व्यक्त करताना संयम राखण्याची अपेक्षा आहे असे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण ठाकरने त्यांना समजावले. यावर मोनालिसा सांगते, "विक्रांत हा माझा प्रियकर असल्याने त्याच्यावर असलेले माझे प्रेम व्यक्त करताना कसली लाज बाळगायची असे मला वाटते आणि परीक्षकांनीदेखील कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. आम्ही दोघे गोविंदा आणि करिश्मा कपूरसारखे नाचलो असे त्यांचे म्हणणे होते." 

Web Title: Kiss in dance with Monalisa and Vikrant in Nach Baliye