खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 12:36 IST2018-10-30T12:35:12+5:302018-10-30T12:36:38+5:30

खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत.

Khushboo Tawde and Sangram Salvi will celebrate there first Diwali | खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अशी साजरी करणार त्यांची पहिली दिवाळी

झी युवा वाहिनीने अगदी कमी वेळातच वैविध्यपूर्ण मालिका सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. झी युवाने नुकत्याच 'सूर राहू दे' आणि 'तू अशी जवळी राहा'  अशा दोन नवीन मालिका प्रेक्षकांसाठी सादर केल्या आहेत. सूर राहूदे मधील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता संग्राम साळवी आणि आम्ही दोघी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हे दोघे यावर्षी लग्नबेडीत अडकले. खुशबू आणि संग्राम यांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता. ही दोघं चाहत्यांची आवडती जोडी आहे आणि ते नेहमीच या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करतात. थोड्याच दिवसात दिवाळी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतील. खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत.

खुशबू आणि संग्राम त्याच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून त्यांच्या परिवारासोबत हा सण साजरा करणार आहेत. दिवाळी म्हटलं की, खूप तयारी आणि साफसफाई आली म्हणून खुशबू आणि संग्राम यांनी जबाबदारी देखील वाटून घेतली आहे. खुशबू फराळ आणि घराची सजावट करणार असून संग्राम तिला त्यात मदत करणार आहे. या दोघांनी सणाची तयारी सुरू देखील केली आहे. दिवाळी म्हणजे भेट वस्तू देणे देखील आले. खुशबूने संग्रामला स्पेशल गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. खुशबू संग्रामसाठी दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घालायला वेगवेगळ्या रंगाचे सदरे घेणार आहे, कारण खुशबूला संग्राम पारंपरिक लूकमध्ये जास्त आवडतो.

याविषयी खुशबू सांगते, "ही आमची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी ती खूपच खास आहे. बॅचलर्स लाईफ मधून बाहेर पडून आता आमचा एक जोडपं म्हणून प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे घराची सजावट वगैरे याची तयारी देखील करावी लागणार आहे. दिवाळीची खरेदी खूप महत्त्वाची असते. यावेळी मी माझ्यासोबतच संग्रामसाठी पण शॉपिंग करणार आहे. मी खूप उत्सुकतेने दिवाळीची वाट बघतेय. माझ्या सर्व चाहत्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांसाठी समृद्धी आणि भरभराटीची जाओ."

Web Title: Khushboo Tawde and Sangram Salvi will celebrate there first Diwali