KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:35 IST2025-10-17T13:33:38+5:302025-10-17T13:35:04+5:30
'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा नागपूरच्या छोट्या स्पृहाला विचारण्यात आला. पण तिला उत्तर माहित नव्हतं, पुढे...

KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ
सध्या 'कौन बनेगा करोडपती १७'ची (KBC 17) चांगलीच चर्चा आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या छोटा स्पर्धक इशित भट त्याच्या उद्धट आणि आगाऊ स्वभावामुळे चांगलाच गाजला. सध्या 'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये छोटे उस्ताद अमिताभ बच्चन यांच्यासह शो गाजवताना दिसत आहेत. अशातच वयाने लहान असलेल्या स्पर्धकांना अमिताभ हॉटसीटवर बसवून वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसतात. महाभारतावरील असाच एक प्रश्न नागपूरच्या स्पृहा शिंखेडेला विचारण्यात आला. काय होता तो प्रश्न?
महाभारतावरील प्रश्न नेमका काय होता?
'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये स्पृहाला महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न तसा सोपा होता, परंतु स्पृहा यामुळे थोडी गोंधळात पडली. त्यामुळे तिने लाईफलाईनचा वापर केल्यावरच तिला उत्तर देण्यात आलं. हा प्रश्न होता की, महाभारतात राजा विराट यांच्या पत्नीचं नाव काय होतं? या पत्नीची अज्ञातवासात असताना द्रौपदीशी मैत्री झाली होती- याचे पर्याय होते- A. भारती, B. सुदेशना, C. रोहिणी, D. उलूपी.
स्पृहाने लाईफलाईनचा वापर केल्यावर ऑडियन्सने एका पर्यायाला बहुमत दिलं. हा पर्याय होता B. सुदेशना. छोट्या स्पृहाने प्रेक्षकांनी जे बहुमत दिलं होतं, त्या पर्यायाचं उत्तर निवडण्याचा निर्णय घेतला. हे उत्तर बरोबर होतं. त्यामुळे महाभारतासंबंधी या प्रश्नाचं उत्तर होतं B. सुदेशना. अशाप्रकारे बुद्धिमत्ता आणि हुशारीच्या जोरावर स्पृहा ५० लाखांच्या प्रश्नापर्यंत जाऊन पोहोचली. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. स्पृहाच्या शांत आणि समंजस स्वभावाचं अमिताभ यांनी चांगलंच कौतुक केलं.