KBC 15 : UPSCची तयारी करणारा मुलगा बनला करोडपती, २१ वर्षीय जसकरण सिंह ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतिहास रचेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:28 AM2023-09-01T11:28:09+5:302023-09-01T11:28:37+5:30

पंजाबच्या जसकरण सिंहने 'कौन बनेगा करोडपती १५'मध्ये एक कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन या पर्वाचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे.

KBC 15 UPSC aspirant jaskaran singh become first contestant to win 1cr in new season attempt 7cr question | KBC 15 : UPSCची तयारी करणारा मुलगा बनला करोडपती, २१ वर्षीय जसकरण सिंह ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतिहास रचेल?

KBC 15 : UPSCची तयारी करणारा मुलगा बनला करोडपती, २१ वर्षीय जसकरण सिंह ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतिहास रचेल?

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिएलिटी शो आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सामान्य नागरिकांना सहभागी होऊन पैसे जिंकत त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. काही दिवसांपूर्वीच केबीसीचं १५वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. केबीसीच्या इतर पर्वांप्रमाणेच हे पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. केबीसीच्या १५व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला आहे. 

पंजाबच्या जसकरण सिंहने 'कौन बनेगा करोडपती १५'मध्ये एक कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन या पर्वाचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरुन जसकरणचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जसकरण ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देताना तणावात दिसत आहे. त्यामुळे आता जसकरण प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन ७ कोटी घरी घेऊन जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

जसकरण सिंह पंजाबमधील छोट्याशा गावात राहत असून तो स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या २१ वर्षीय जसकरणने सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत एक कोटी जिंकल्याने त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. आता तो ७ कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन इतिहास रचेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Web Title: KBC 15 UPSC aspirant jaskaran singh become first contestant to win 1cr in new season attempt 7cr question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.