KBC 13 : अचानक अमिताभ बच्चन यांच्यासमोर रडू लागला जॉन अब्राहम, स्टेजवर एकच शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:05 IST2021-11-24T15:05:03+5:302021-11-24T15:05:48+5:30
John Abraham at KBC : जॉन या शोमध्ये खूप मस्ती करताना दिसणार आहे. पण अचानक तो इतका इमोशनल झालेला दिसेल की, त्याच्या डोळ्यातून अश्रूही येऊ लागतात.

KBC 13 : अचानक अमिताभ बच्चन यांच्यासमोर रडू लागला जॉन अब्राहम, स्टेजवर एकच शांतता
हॅंडसम हंक आणि बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक जॉन अब्राहम (John Abraham) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'कौन बनेगा करोडपती १३' (KBC 13) मध्ये येणार आहे. केबीसीच्या शानदार शुक्रवार एपिसोडमध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार त्यांच्या आगामी 'सत्यमेव जयते २' सिनेमाचं प्रमोशन करतील आणि गप्पांचा खास फडही रंगवतील. जॉन या शोमध्ये खूप मस्ती करताना दिसणार आहे. पण अचानक तो इतका इमोशनल झालेला दिसेल की, त्याच्या डोळ्यातून अश्रूही येऊ लागतात.
शो च्या प्रोमो व्हिडीओमध्ये बघू शकता की, जॉन अब्राहम आपल्या एन्ट्रीने शोमध्ये रंगत आणतो. अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा करण्यासोबत जॉन आपल्या फुटबॉल ट्रिक्सही दाखवतो. व्हिडीओच्या सुरूवातील जॉन आणि दिव्या खोसलाची धमाकेदार एन्ट्री होते. त्यानंतर जॉन केबीसीच्या मंचावर अमिताभ यांच्यासमोर काही मुव्ह्स करतो.
जॉनची सेटवरील मस्ती इथेच थांबत नाही. यानंतर तो आपल्या शानदार फुटबॉल ट्रिक्स अभिताभ बच्चन यांना शिकवतो. अमिताभ बच्चनही यावेळी एन्जॉय करताना दिसतात. जॉन यावेळी त्याचे सीक्स अॅब्सही दाखवतो. तेव्हा त्याच्या महिला फॅन्स चीअर करू लागतात.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा, मस्ती सुरू असताना जॉन अचानक इमोशनल होतो आणि इतकंच नाही तर रडूही लागतो. जॉन डोळ्यात अश्रू येतात. जॉनला रडताना पाहून स्टेजवर एकाएकी शांतता पसरते. जॉन यावेळी का रडला हे तर शो टेलिकास्टनंतरच समजेल.